असे म्हणतात प्रेम आंधळे असते. या आंधळ्या प्रेमातून अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. अनेकदा तर काही लोक जीवही घेतात. आता अशीच एक घटना समोर आली आहे. लव्ह ट्राएंगलमधून एकाने आपल्याच पत्नीला जीवंत जाळल्याचे घटना समोर आली आहे. (man burn thier wife for love)
मोहालीमध्ये क्रूर पतीने पत्नीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. जखमी पत्नी ३ महिन्यांहून अधिक काळ व्हेंटिलेटरवर होती. संबंधित महिलेचे नाव सुजाता असे आहे. त्रासातून सावरल्यानंतर आता तिने आपली भयानक कहानी सांगितली आहे.
सुजाता आणि तिच्या कुटुंबीयांनी सासरच्या लोकांवर गंभीर आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सुजाता यांनी सांगितले की, ८ जानेवारी २०२२ रोजी लालरू येथे माझ्या पती, जो मर्चंट नेव्हीमध्ये मुख्य अभियंता पदावर आहे, त्याने मला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता.
सुजाताने सांगितले, की आता याप्रकरणी पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे, मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तिचे २०११ मध्ये लग्न झाले होते आणि ती अजूनही गरोदर आहे. तिच्या पोटात २ मुले वाढत आहेत आणि आधीच एक ६ वर्षांचा मुलगा आहे.
सुरुवातीपासूनच सासरच्या मंडळींचं तिच्याशी वागणं खूप चुकीचं होतं, मला कोणतीही गोष्ट करायची असेल तर परवानगी घ्यावी लागते. जेव्हा ती चुकून पंजाबीत बोलायची तेव्हा तिला मारहाण करण्यात यायची. छोट्या छोट्या गोष्टीवरून तिला मारहाण करण्यात यायची, असे सुजाताने सांगितले आहे.
तसेच मर्चंट नेव्हीत असलेल्या तिच्या नवऱ्याचे बाहेर कुठेतरी एका मुलीशी प्रेमसंबंध होते. जिचे नावही मी एफआयआरमध्ये दिले आहे, असे सुजाताने म्हटले आहे. पीडितेचा भाऊ जो सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे, त्याने सांगितले की, जानेवारीपासून आता मे महिना सुरू झाला आहे. ते दररोज पोलिसांच्या चकरा मारत असतात, मात्र अजूनही पोलिसांनी या प्रकरणी कोणाला अटक केली नाही.
महत्वाच्या बातम्या-
भोंगे हटवण्यासाठी मनसेनं उचललं ‘हे’ डिजिटल पाऊल, ठाकरे सरकारची करणार कोंडी
VIDEO: मुलीला छेडणं कपील शर्माला पडलं महागात, कपिलच्या दिली कानाखाली, वाचा संपूर्ण प्रकरण
हॉस्पिटलच्या बेडवर बेशुद्ध अवस्थेत दिसले मिथुन, मुलाने दिली महत्वाची हेल्थ अपडेट, म्हणाला…