Share

२१ वर्षीय मामीने केले १६ वर्षीय भाच्याचे लैंगिक शोषण; नागपूरातील धक्कादायक घटनेने उडाली खळबळ

नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका मामीने आपल्याच भाच्याचे वारंवार लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. संबंधित घटना ही पारशिवनी येथून उघडकीस आली आहे. (mami rape 16 year child)

या प्रकरणी पोलिसांनी २१ वर्षी मामीवर गुन्हा दाखल केला आहे. मामी भाच्याचे वारंवार लैंगिक शोषण करत होती. तसेच त्यानंतर तिने त्याचा व्हिडिओही शुट केला होता. ती व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमक्या देत होती. त्यामुळे संतापलेल्या भाच्याने पोलिस तक्रात दाखल केली आहे.

पीडित मुलगा हा दहावीच्या वर्गात शिकतो. २०२० मध्ये त्याच्या मामाचे एका २१ वर्षांच्या तरुणीसोबत लग्न झाले होते. २६ ऑगस्ट २०२० मध्ये हा मुलगा मामाकडे गेला होता. यावेळी त्याच्या मामीने त्याचा लैंगिक छळ केला होता. तसेच त्याचे व्हिडिओ हे मोबाईलवर शुट केले. त्यानंतर मुलगा घरी परतला.

भाचा घरी परतल्यानंतर मामीने भाच्याच्या फोनवर संपर्क साधला. तसेच त्याला ती लैंगिक छळाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊ लागली. त्यानंतर त्याला धमकी देऊन वारंवार त्याचे लैंगिक शोषण करु लागली. त्यानंतर ती मामासोबत भांडून माहेरी गेली.

त्यानंतर मामी भाच्याला माहेरी बोलवू लागली आणि तिथे त्याचे लैंगिक शोषण करु लागली. मामीचा असह्य त्रास सहन होत नसल्यामुळे मुलाने याबाबत नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी मुलासह पोलिस स्टेशन गाठले. त्यांनी त्या तरुणीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी तरुणीविरुद्ध ठार मारण्याची धमकी देणे आणि लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून पोलिसांनी अजूनही तरुणीला अटक केलेली नाही. पण या घटनेमुळे संपूर्ण परीसरात एकच खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! पतीचा मर्डर करण्यासाठी पत्नीने नेमले पाच सुपारी किलर, खुलासा झाल्यावर पोलिसही हादरले
काय सांगता! पराभूत उमेदवार होणार नगरसेवक, शिवसेनेला लागली लॉटरी
प्रेमाची अजब कहाणी! 80 वर्षांचे आजोबा पडले 84 वर्षांच्या आजीच्या प्रेमात; दोघे पळून गेले मात्र….

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now