राजधानी जयपूरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. जयपूर विकास प्राधिकरणातील (जेडीए) भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करताना एसीबीने लाचखोरीप्रकरणी झोन उपायुक्तांसह ५ अधिकारी व कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. एसीबीने जेडीए झोन ४ च्या उपायुक्त ममता यादव तसेच जेईएन श्याम मालू, लेखापाल रामतूफान, एएओ विजय मीना आणि ऑपरेटर अखिलेश यांना अटक केली आहे. (mamata yadav arrested)
एसीबीचे एडीजी दिनेश एमएन म्हणाले की, तक्रारदाराने या संदर्भात एसीबी मुख्यालयात तक्रार केली होती. लिज देण्याच्या बदल्यात झोन ४ मधील उपायुक्तांसह इतर कर्मचारी लाखोच्या लाचेची मागणी करत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता ती बरोबर असल्याचे समोर आले आहे.
माहितीची पडताळणी केल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यासाठी ब्युरोने कंबर कसली होती. एसीबीच्या पथकाने सोमवारी जेईएन श्याम मालू यांना एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. याप्रकरणी एकूण १ लाख १० हजार रुपयांची लाचेची रक्कम जप्त करण्यात आली आहे.
एसीबीचे एएसपी बजरंगसिंग शेखावत यांनी सांगितले की, भूखंडाचा भाडेपट्टा देण्यासाठी सुमारे १५ लाख रुपयांची लाच मागितली जात होती. झोनच्या उपायुक्त ममता यादव यांनी सुमारे दोन ते तीन लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र एसीबीला याची माहिती आल्यानंतर यादवने मंगळवारी रोख रक्कम घेण्यास नकार दिला.
पुराव्याच्या आधारे एसीबीने एकूण ५ आरोपींना अटक केली आहे. त्यांची चौकशी केली जात आहे. एसीबीच्या ताब्यात आलेल्या या आरोपींच्या घरांची एसीबीची पथके झडती घेत आहेत. तपासादरम्यान अनेक खुलासे समोर येऊ शकतात. एसीबीच्या या कारवाईनंतर जेडीएमध्ये खळबळ उडाली आहे.
कारवाईदरम्यान झोन उपायुक्त ममता यादव यांच्या चेहऱ्यावर कोणतेही टेन्शन दिसले नाही. तसेच महिला अधिकारी घाबरलेलीही नव्हती. जेव्हा रेड पडली तेव्हा ती हसत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच मंदिरात कोणी प्रसाद वाटत असेल तर मी नाही कसे म्हणू शकते असेही तिने म्हटले आहे.
विशेष म्हणजे गेल्या दोन-तीन वर्षांपासून एसीबी भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तत्परतेने कारवाई करत आहे. राजस्थानमध्ये एसीबी दररोज कोणत्या ना कोणत्या अधिकाऱ्यावर कारवाई करत आहे. असे असतानाही भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये कोणताही फरक पडलेला नाही. एसीबीने यापूर्वीही अनेक लोकप्रतिनिधींना लाच घेताना पकडले आहे.
महत्वाच्या बातम्या-
आमदार नितेश राणेंना जामीन मंजूर, न्यायालयाच्या ‘या’ अटी पाळाव्या लागणार
पुन्हा एकदा सबाचा हात पकडताना दिसला ह्रतिक रोशन; कॅमेरा पाहताच लपवले तोंड, पहा व्हिडिओ
पहले हिजाब, फिर किताब; हिजाब प्रकरणावरून महाराष्ट्रातील मुस्लिम तरूणांची बॅनरबाजी, म्हणाले..