रस्ते अपघाच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. आता कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगडमधून एक अशी घटना समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एक बहिण आपल्या भावासोबत कपडे घेण्यासाठी गेली होती, पण तिचा अपघात भीषण अपघात झाल्यामुळे तिचा अपघातात मृत्यु झाला आहे. (mamata vhadge accident death)
कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यातील हासूरमध्ये संबंधित घटना घडली आहे. याठिकाणी आपल्या भावासोबत नवीन कपडे खरेदी करण्यासाठी एक तरुणी गेली होती. पण कपडे खरेदी करुन परत येत असताना भावाचं दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि तरुणी रस्त्यावरच आपटली.
या अपघातात तरुणी गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला आहे. या घटनेनंतर संपुर्ण परीसरात एकच खळबळ उडाली आहे. ममता सीताराम व्हडगे असे तरुणीचे नाव आहे. ती २३ वर्षांची होती.
ममता ही हासूरमध्ये राहत होती. तसेच ती पुण्यात नोकरीला होती. पण गावची यात्रा असल्याने दोन दिवसांपूर्वी ती आपल्या गावाला गेली होती. गावच्या यात्रेनिमित्त नवीन कपडे खरेदी करण्यासाठी ती घराबाहेर पडली होती. ती कपडे खरेदी करण्यासाठी कोवाडला गेली होती.
कपडे खरेदी करुन ती आपल्या घरी परतत होती. यावेळी कागणी गावाजवळून जात असताना एका वळणावरुन भावाचं दुचाकीवरचे नियंत्रण सुटले. दुचाकीची गती जास्त होती, त्यामुळे ममता रस्त्यावर जोरात आपटली. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.
या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, त्यामुळे तिचा जागीच मृत्यु झाला. ममताने अलीकडेच कोवाड महाविद्यालयातून आपले पदवीचे शिक्षण पुर्ण केले होते. त्यानंतर तिला पुण्यातील एका कंपनीत नोकरीही लागली होती. सर्वकाही सुरळीत होते, पण अचानक हा अपघात झाला आणि या अपघातात तिचा मृत्यु झाला. ममताच्या अशा अचानक जाण्याने तिच्या कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
महत्वाच्या बातम्या-
…तर मी ‘त्या’ दलालाला जोड्यानं मारेन; संजय राऊत किरीट सोमय्यांवर बरसले
राऊत विरुद्ध सोमय्या: …तर मी राजकारण सोडेन; संजय राऊतांचे किरीट सोमय्या यांना आव्हान
भाजपला दणका! माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने आमदारांसह केला शिवसेनेत प्रवेश, राजकीय वर्तुळात खळबळ