Share

लॉकडाऊनमध्ये लोकांना मदत करणाऱ्या सोनू सूदची बहिण मालविका निवडणूकीत पिछाडीवर

पंजाब विधानसभेच्या ११७ जागांचे निकाल येत आहेत. गुरुवारी सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या मतमोजणीत सुरुवातीचा कल आम आदमी पक्षाच्या बाजूने येताना दिसत होता, पण नंतर वेगळं चित्र पाहायला मिळालं होतं. काँग्रेस जोरदार टक्कर देत पुढे निघताना दिसत होते पण आपने जोरदार टक्कर दिली आहे. (malvika sood in punjab election)

काँग्रेसला जोरदार धक्का देत आप बहुमताच्या दिशेने आगेकूच करताना दिसत आहे. आम आदमी पार्टीने ७४ जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेसला ३० आणि अकाली दल १० जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे पंजाबमध्ये आपला बहूमत मिळण्याची शक्यता आहे.

या निवडणुकीत भाजप आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील पंजाब लोक काँग्रेस सोबत युती करून निवडणूक लढवत आहेत, तर शिरोमणी अकाली दल बसपासोबत रिंगणात आहे. दुसरीकडे आम आदमी पक्ष एकटाच लढत असताना आम आदमी पार्टीने जोरदर टक्कर दिली आहे.

पटियालामधून कॅप्टन अमरिंदर सिंग पिछाडीवर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मतमोजणीच्या पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत कॅप्टन काही फरकाने मागे पडले आहे. दुसरीकडे, मोगातून काँग्रेस उमेदवार आणि अभिनेता सोनू सूदची बहीण मालविका सूदही पिछाडीवर आहेत.

दरम्यान, एक्झिट पोल पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार असल्याचा दावा करत आहेत. तिथे आम आदमी पक्षाचे भगवंत मान आणि काँग्रेसचे चरणजीत सिंह चन्नी हे मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार आहे. दुसरीकडे, कॅप्टन अमरिंदर सिंग हे नवा पक्ष उभारत भाजपसोबतच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अकाली दलाची बसपासोबत युती आहे.

महत्वाच्या बातम्या-
कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांच्या मुलांचेच लागले ‘वॉन्टेड’ पोस्टर; महाराष्ट्र हादरलं
उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना ‘मॅजिक’ दाखवणार? पहिल्या दीड तासात शिवसेनेचा फ्लॉप शो
उत्तराखंडमध्ये भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का, भाजप ३६ जागांसह आघाडीवर तर काँग्रेसला २८ जागा

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now