Share

सामान्य नागरीकाने केली माळशेज घाटातील लुटारू पोलिसांची पोलखोल, व्हिडीओ होतोय व्हायरल

माळशेज घाटातून प्रवास करताय? लुटारू पोलिसांपासून सावध राहा, आधी हा व्हिडीओ पाहा

सामान्य नागरीकाने केली माळशेज घाटातील लुटारू पोलिसांची पोलखोल, व्हिडीओ होतोय व्हायरल

माळशेज घाट हा सर्वांनाच माहिती आहे. या घाटात आधी खुप लुटमारी व्हायची. काही दिवसांपुर्वी हा घाट मृत्युचा घाट बनला होता. येथे दरड कोसळण्याचा धोकाही जास्त आहे. आता या घाटात पोलिस थांबतात. अनेक ठिकाणी पोलिसांनी स्पॉट या घाटात ठरवलेले आहेत.

कल्याण- नगर मार्गावर माळशेज घाटात अनेक पोलिस थांबलेले असतात. पण हे पोलिस वाहतुक सुरळीत करायचं सोडून लुटमारी करत असतात अशी पोलखोल रविंद्र पोखरकर या व्यक्तीने केली आहे. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओला लाखो लोकांनी पाहिलं आहे आणि १० हजार लोकांपेक्षा जास्त लोकांनी याला शेअर केलं आहे.

माळशेज घाटातील पोलिस कशा प्रकारे सामान्य नागरिकांना लुटतात याचा पंचनामा त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी लोकांना आवाहन केलं आहे की, हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवा. या व्हिडीओमध्ये रविंद्र यांनी दावा केला आहे की, येथील वाहतुक पोलिस नागरिकांना फसवत आहेत.

कोणालाही अडवून त्यांच्याकडून दंड वसुली करत आहेत. जर एखाद्याने चुकून सीट बेल्ट लावलेले नसेल तर लगेच त्याला अडवून अरेरावी करून दंड वसूल केला जात आहे. तसेच दंड जर जास्त असेल तर ऍडजस्टमेंट करून पावती न देता पैसै पोलिस आपल्याच खिशात घालताना दिसतात, असं ते म्हणाले.

तसेच पोलिसांच्या गाडीला असलेली स्पीडगनही त्यांच्याच इशाऱ्यावर चालते असं त्यांचं म्हणणं आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, जर तुम्ही नॉर्मल स्पीडने गाडी चालवत असाल तर स्पीडगन वाढीव स्पीड दाखवते आणि पोलिस ड्रायव्हरकडून २ हजारांचा दंड फाडतात.

रस्ताच्या कडेला एक हॉटेल आहे तिथे ते पैशांची मोजणी करतात आणि सगळ्यांमध्ये हे पैसै वाटून घेतात. जवळपास वीकेंडला ५०-६० हजारांचं कलेक्शन त्यांच्यामध्ये होत. ते हे सगळे पैसै वाटून घेतात. व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे ते म्हणाले की, जवळपास १०-१५ पोलिस एकाच ठिकाणी थांबले आहेत. ही अशी कशी ट्युटी आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

https://www.facebook.com/100000581086456/posts/pfbid02PVUZ67MaMFT47xJ2NPodLoKj8Ln8zRfZfivKZhYrmP9gPeSjFdnG3Pg2NuiD6orpl/?d=n

महत्वाच्या बातम्या
सामान्य नागरीकाने केली माळशेज घाटातील लुटारू पोलिसांची पोलखोल, व्हिडीओ होतोय व्हायरल
तिसरा सामना जिंकूनही खूपच नाराज नाराज आहे ऋषभ पंत; धक्कादायक कारण आले समोर
‘सदाभाऊंना आमदारकी नाही किमान बंगल्यावर आलेल्या पाहुण्यांना चहापाणी द्यायचं काम तरी द्या”
किळसवाणे! पुतिन यांच्यासोबत बॉडीगार्डदेखील जातात वॉशरूमममध्ये, करतात ‘हे’ विचित्र काम

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now