Share

मालेगावच्या नदीतून वाहताना दिसले रक्तमिश्रित पाणी, लोकांनी सांगितले धक्कादायक कारण

नदीपात्र स्वच्छ नसल्याच्या अनेक तक्रारी येत असतात. तसेच नदीपात्रा शेजारी राहणारे नागरिक नदीत कचरा टाकत असतात. त्यामुळे नदीत मोठ्या प्रमाणात घाण साचते. पण नदीत वाहणारे पाणी लाल रंगाचे झाले तर? आता अशीच एक बातमी नाशिक जिल्ह्यातून समोर आली आहे. (malegaon river shocking information)

मालेगाव शहरातून वाहणाऱ्या मोसम नदीत लाल रंगाचे पाणी वाहताना दिसून आले आहे. हे पाणी रक्तमिश्रित असल्याचे म्हटले जात आहे. मालेगावच्या सांडव्या पुलाखालून वाहणाऱ्या मोसम नदीत हे रक्तमिश्रित पाणी वाहताना दिसले आहे. रक्तमिश्रित पाणी असण्यामागेही हैराण करणारे आहे.

शहरातील पूर्व भागात असलेल्या काही कत्तलखान्यातून रक्तमिश्रित पाणी नेहमी ड्रेनेडद्वारे मोसम नदीत सोडलं जातं. पावसाळा सुरु झाल्यामुळे सर्वत्र पाऊस पडतोय. या पावसामुळे ड्रेनेज आणि नाले हे चॉकअप होऊन जातात. कारण त्यांची साफसफाई झालेली नसते.

चॉकअप होऊन हे पाणी सरकार चौकातून ते थेट खाली येते. त्यामुळे आता मोसम नदीच्या सांडवा पुलावर हे पाणी आले आहे. त्यामुळे तिथल्या व्यवसायिकांची मोठी अडचण झाली आहे. रक्तमिश्रित पाण्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.

या पाण्यामुळे तिथल्या स्थानिक नागरिकांना आणि व्यवसायिकांना त्रास होते आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाविरोधात नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच याबाबत नागरिकांनी तक्रारही केली होती. पण वारंवार तक्रार करुनही कर्मचारी त्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.

दरम्यान, शहरीभागात रक्तमिश्रित पाणी वाहण्याच्या घटना याआधीही अनेकवेळा घडल्या आहे. सार्वजनिक नागरिक सुविधा समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनेही करण्यात आली होती. पण अजूनही यावर कोणता निर्णय मनपा प्रशासनाने घेतलेला नाही.

महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादी-काँग्रेसशी युती केली, भाजपला शत्रू बनवले, आता शिवसेनाही फोडली, नक्की राऊत कोणाचे?
disney ला कळाली त्यांची चूक, जॉनी डेपची माफी मागत दिली तब्बल एवढ्या हजार कोटींची ऑफर
वयाच्या ४५ व्या वर्षी ‘गदर’मधल्या तारा सिंगच्या सकीनाने घातले ‘असे’ कपडे, केले बोल्डनेसचे प्रदर्शन

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now