Share

छैय्या छैय्या गर्ल मलायका अरोरा भडकली; म्हणाली, सलमानने मला मोठं नाही केलं, जर माझं कनेक्शन..

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा हिला कोण ओळखत नाही. मलायका अरोराने (Malaika Arora) शाहरुख खानच्या (Shahrukh khan) ‘दिल से’ चित्रपटातील ‘छैय्या छैय्या’ या आयटम साँगने तिच्या करिअरची सुरुवात केली होती. हे गाणे चालत्या ट्रेनवरती चित्रित करण्यात आले आहे. या गाण्याने लोकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते. (Malaika Arora and salman khan)

आजही त्यांचे हे गाणे लोकांच्या ओठावर आहे. त्यांचे हे गाणे आजही लोकांना ऐकायला आवडते. याशिवाय ती तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच तिच्या पर्सनल लाईफबद्दलही चर्चेत असते. मलायकाने 1998 मध्ये सलमान खानचा (Salman khan) भाऊ अरबाज खानसोबत लग्न केले आणि लग्नाला बराच काळ लोटल्यानंतर 2017 मध्ये दोघांनीही परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता ती अर्जुन कपूरसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे.

मलायका अरोराने तिच्या खास गाण्यांनी चित्रपटांना थक्क केले आहे. सलमान खानच्या ‘दबंग’मधील ‘मुन्नी बदनाम’ या गाण्यानेही तिने सर्वांची मने जिंकली. एकेकाळी वादात सापडलेली अभिनेत्री राखी सावंत हिने मलायकासाठी मोठं वक्तव्य केलं होत. राखी म्हणाली होती की, मलायका अरोराला सलमान खानसोबतच्या नात्यामुळे आयटम गर्ल म्हटलं जात नाही.

यानंतर मलायका अरोरा तिच्या एका मुलाखतीदरम्यान म्हणाली की, जर माझे सलमानसोबत चांगले संबंध असतील, तर मी त्याच्या प्रत्येक चित्रपटात असायला हवे, तो जे काही गाणे करतो त्यात माझी खास भूमिका असली पाहिजे. त्यांनी मला बनवले नाही, मी एक स्वनिर्मित स्त्री आहे. मलायका अरोराने सलमान खानच्या ‘दबंग’ आणि ‘दबंग 2’ मध्ये खास गाणी केली होती, जी प्रेक्षकांना खूप आवडली होती.

याशिवाय त्याच्याबाबत अनेकदा वादग्रस्त विधाने समोर आली आहेत, ज्यामध्ये सलमान खान आणि कुटुंबीयांनी अरबाज खानच्या करिअरला पाठिंबा न दिल्यामुळे त्याच्यात आणि कुटुंबात तेढ निर्माण झाल्याचे म्हटले होते. तथापि, अभिनेत्रीने ही गोष्ट पूर्णपणे अफवा असल्याचे सांगितले आणि म्हटले की, त्याने अरबाजसाठी काय करावे? चित्रपट सुरू करावा, भूमिका घ्यावी आणि कोणते पात्र योग्य आहे आणि कोणते नाही ते सांगावे?

मलायका अरोरा याविषयी बोलताना पुढे म्हणाली की, “तीघे भाऊ एकमेकांच्या खूप जवळ आहेत, पण त्यांच्याकडून करिअरबाबत कोणताही निर्णय घेतला जात नाही.” आम्ही तुम्हाला सांगतो की, सध्या ती अर्जुन कपूरसोबत आहे आणि चाहते दोघांच्या लग्नासाठी उत्सुक दिसत आहेत. दरम्यान, त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्याही आल्या होत्या, ज्या अर्जुन कपूरने फेटाळल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या
धुम्रपान तुम्ही करताय पण परिणाम नातवंडांना सहन करावे लागणार, संशोधकांचा मोठा खुलासा
खुन्नस ठेवून मित्रानेच काढला काटा; मुळशी पॅटर्न पाहून केला खून, आरोपीची पोलिसांकडे कबुली
‘औरंगाबादमधील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देणार; उद्धव ठाकरेंची घोषणा
‘मविआ सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?’ सोमय्यांना दिलेल्या नोटीशीमुळे फडणवीसांचा हल्लाबोल

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now