bjp : राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. नाराजीचे सत्र देखील वाढलेले पाहायला मिळत आहे. शिवसेनेतील दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहे. यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात तणावाचे वातावरण आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून शिवसेनेला गळती लागल्याच पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तींनी शिंदे गटात प्रवेश केले आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी – कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनी देखील शिंदे गटाची वाट धरली आहे.
एवढंच नाही तर, आता चित्र काहीस वेगळं पाहायला मिळत आहे. शिंदे गटातील नेते भाजपात जातं असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या राज्याच्या राजकारणात शिंदे गटातील काही आमदार मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
माध्यमांशी बोलताना तपासे यांनी म्हंटलं आहे की, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटातील आमदार भाजपात सामील होतील.’ तपासे यांच्या वक्तव्याने शिंदे गटात एकच खळबळ उडाली असून यावर अद्याप शिंदे गटातील नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.
तपासे म्हणतात, ‘सत्तांतर घडवून आपल्याकडून फार मोठी चूक झाली, मंत्रीपदाची स्वप्न दाखवली गेली, पण ती पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे आपला डाव कुठेतरी फसला असल्याची कबुली शिंदे गटाचे नेते आपल्या मतदारसंघात देत आहेत, असा मोठा खुलासा तपासे यांनी केला आहे.
‘राज्यातील सत्तांतराचा डाव फसला असून ज्या पद्धतीनं शिंदे सरकारने महाराष्ट्रात सत्ता काबीज केली, ते निश्चितच महाराष्ट्राला आवडलेलं नाही. यामुळे शिंदे गटातील नेते आता भाजपात जातील की काय?, अशी भीती सध्या मुख्यमंत्री शिंदे यांनी वाटतं असल्याच तपासे यांनी म्हंटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
सनी देओलच्या मुलाचा झाला गुपचूप साखरपुडा; काय आहे नेमकं यामागील कारण वाचा
Sunny Deol: सनी देओलच्या ‘चुप’ने बाकीच्या चित्रपटांना केलं ‘चिडीचुप’ पहिल्याच दिवशी केली विक्रमी कमाई
Sunny Deol: राहायला नव्हते घर, उपाशीपोटी काढले दिवस, अजूनही मला.. सनी देओलच्या अभिनेत्रीची कहाणी ऐकून डोळ्यातून पाणी येईल