Share

…तेव्हाच एकमुखाने पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड केली; आमदार महेश शिंदेंचं मोठं वक्तव्य

mahesha shinde

आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र त्यानंतर माध्यमांशी बोलताना महेश शिंदे यांनी केलेलं वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. महेश शिंदे यांनी ठाकरेंना शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख केवळ माजी मुख्यमंत्री केला.

आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. शिवसेनेतील ऐतिहासिक बंडामुळे निर्माण झालेल्या राजकीय संकटाचं सावट या वाढदिवसावर आहे. अशातच उद्धव ठाकरेंनी मला भेटवस्तू, पुष्पगुच्छ नको तर प्रतिज्ञा पत्र द्या असं आवाहन केलं.

त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटात सहभागी झालेल्या आमदारांनी देखील उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. अशाच शुभेच्छा आमदार महेश शिंदे यांनी देखील दिल्या आहेत.

वाचा नेमकं काय म्हंटलं आहे?
विशेष बाब म्हणजे माध्यमांशी बोलताना महेश शिंदे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना थेट शिवसेनेचे पक्षप्रमुखच करून टाकले. याबाबत बोलताना ते म्हणाले, की ज्या दिवशी आमची उपनेत्यांची बैठक झाली, एकमुखाने पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड केली.’

दरम्यान, पुढे बोलताना महेश शिंदे म्हणाले की, आम्ही तक्रार करायचो, मात्र ते दुर्लक्ष करायचे. आदिवासी विभागाचा निधी 800 कोटींचा निधी परस्पर वाटून घेतला. मला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी एक फोनही केला नाही. मनाला वाटेल तसा निधी वाटला गेला, मुख्यमंत्री लक्षच देत नव्हते.’

याचबरोबर आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री होते, त्यांनी केवळ खजिना लुटण्याचे काम केले. राजपुत्र साथ देत होता, अशी जहरी टीका महेश शिंदे यांनी केली आहे. सध्या महेश शिंदे यांनी केलेल्या व्यक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now