फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकार एकमेकांचे स्पर्धक आहेत. ज्यामुळे त्यांच्या चित्रपटांमध्ये नेहमीच मोठ्या प्रमाणावर स्पर्धा असते. पण कधी कधी या स्पर्धेमुळे कलाकारांची मैत्री तुटते आणि त्यांच्यामध्ये वाद व्हायला सुरुवात होते.
असेच काही शाहरुख खान आणि सनी देओलसोबत झाले होते. या वादाचे मुख्य कारण दिग्दर्शक महेश भट्ट होते. कारण महेश भट्टला सनी देओलचे करिअर खराब करायचे होते. त्यांना सनीचा ड्रीम प्रोजेक्ट खराब करायचा होता. हे स्वप्न त्यांना महागात पडले.
सनी देओल आणि महेश भट्टने ‘गुनाह’ चित्रपटामध्ये एकत्र काम केले आहे. त्यावेळी या दोघांमध्ये वाद झाले होते. म्हणून सनीने महेशसोबत कधीच काम न करण्याचा निर्णय घेतला होता. तो त्यांच्या सगळ्या चित्रपटांना नकार देत होता.
ही गोष्ट महेश भट्टला आवडली नाही. त्यामुळे त्यांनी सनीचे करिअर खराब करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी सनीचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा चित्रपट फ्लॉप करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तशी तयारी सुरू केली.
सनी देओल त्याचा ड्रीम प्रोजेक्ट ‘घातक’ चित्रपटावर काम करत होता. पण या चित्रपटाला बनायला खुप वेळ लागत होता. त्यामुळे हा चित्रपट सनीच्या हृदयाच्या खुप जवळ होता. तो या चित्रपटासाठी खुप मेहनत करत होता. दिवसरात्र काम करत होता.
ही गोष्ट महेश भट्टला माहिती होती. त्यांना हा चित्रपट खराब करायचा होता. म्हणून त्यांनी घातक चित्रपटासारखा दुसरा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. या कालावधीमध्ये पुजा भट्टचे करिअर खराब सुरू होते. म्हणून महेशने मुलीचे करिअर वाचण्याचा विचार केला आणि चित्रपटाची तयारी सुरू केली.
हा चित्रपट होता ‘चाहत’. या चित्रपटात शाहरुख खान आणि पुजा भट्ट मुख्य भूमिकेत होते. चाहत चित्रपटाची स्टोरी घातक चित्रपटासारखी बनवण्यात आली होती. चाहत चित्रपट घातक चित्रपटाच्या अगोदर रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या गोष्टींमूळे प्रेक्षक अगोदरच घातक चित्रपटासारखा चित्रपट पाहतील. ज्यामुळे सनी देओलचा घातक चित्रपट फ्लॉप होईल. त्याचा ड्रीम प्रोजेक्ट फ्लॉप होईल. म्हणून सनीचे करिअर खराब होईल. महेश भट्टने सनीचे करिअर खराब करण्याची सगळी तयारी केली होती.
पण या गोष्टीमूळे सनी देओलचे नाही तर पुजा भट्टचे करिअर फ्लॉप झाले. कारण चाहत चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. म्हणून पुजा भट्ट आणि शाहरुख खानचे करिअर खराब झाले होते. सनी देओलला काहीही फरक पडला नाही.
लोकांना शाहरुख खान रोमँटिक हिरो म्हणून आवडत होता. त्याला सनी देओलसारखे काम चाहत चित्रपटात जमले नाही. म्हणून त्याचे फॅन्स नाराज झाले. या गोष्टीचा परिणाम महेश भट्ट आणि शाहरुख खानच्या नात्यावर झाला. त्या दोघांमध्ये वाद झाले.
त्यासोबतच पुजा भट्टने अजून एक फ्लॉप चित्रपट दिला. ज्यामुळे तिचे करिअर खराब झाले. १९९६ मध्ये जुन महिन्यात चाहत चित्रपट रिलीज होऊन फ्लॉप झाला होता. तर १९९६ च्या नोव्हेंबर महिन्यात घातक चित्रपट रिलीज झाला होता आणि हा चित्रपट सुपरहिट झाला होता.
सनी देओलचे करिअर फ्लॉप करण्याच्या नादात महेश भट्टने स्वतः च्या मुलीचे करिअर फ्लॉप केले होते. त्यासोबतच स्वतः चे करोडोचे नुकसान केले होते. एवढेच नाही तर शाहरुख खानसारखा मित्र देखील त्यांनी गमावला होता.
चाहत चित्रपट बनवणे महेश भट्टची सर्वात मोठी चुक होती. चित्रपटामूळे शाहरुख खान आणि सनी देओलमध्ये देखील वाद झाले. या गोष्टीमूळे सनी देओलला काहीही नुकसान झाले नाही. तो त्याच्या करिअरमध्ये खुप चांगले काम करत होता.
महत्वाच्या बातम्या
‘तो’ ठरला त्या भारतीय जवानाचा शेवटचा व्हॉइस मेसेज; ‘हिजाब आणि भगव्यावरून भांडू नका…’
महेश भट्ट सर्वांसमोर मला मुलगी म्हणून बोलावयाचे, पण रात्री मात्र हाॅटेलमध्ये…
फक्त जॅकलीनलाच नाही तर ठग सुकेशनने या अभिनेत्रींनाही दिले आहेत महागडे गिफ्ट्स, नावं वाचून अवाक व्हाल
फक्त जॅकलीनलाच नाही तर ठग सुकेशनने या अभिनेत्रींनाही दिले आहेत महागडे गिफ्ट्स, नावं वाचून अवाक व्हाल