Share

फक्त चित्रपटात नाही, तर खऱ्या आयुष्यात पण हिरो आहे महेश बाबू, स्वत:च्या पैशांनी ३० मुलांवर केली हार्ट सर्जरी

साऊथचा सुपरस्टार महेश बाबू त्याच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या अभिनयाच्या जोरावरच तो चित्रपट सुपरहिट बनवून टाकतो. पण महेश बाबू हा फक्त चित्रपटाताच हिरो नाहीये, तो खऱ्या आयुष्यातलाही हिरोच आहे. कारण तो अनेकदा गरजूंना मदत करताना दिसतो. (mahesh babu help 30 childs to heart surgery)

महेश बाबू हा आपल्या फाउंडेशन अंतर्गत अनेक अनाथ आणि निराधार लोकांना मदत करतो. नुकत्याच झालेल्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त त्याने ३० हून अधिक मुलांचे प्राण वाचवण्यासाठी आर्थिक मदत केली आहे. त्याच्यामुळे ३० मुलांवर हार्ट सर्जरी करण्यात आली आहे.

महेश बाबूने आंध्र हॉस्पिटल, विजयवाडा आणि महेश बाबू फाउंडेशनच्या डॉक्टरांच्या मदतीने ३० मुलांवर हार्ट सर्जरी करण्यात आली आहे. महेश बाबूची पत्नी नम्रता शिरोडकरने तिच्या इंस्टाग्रामवर आंध्र प्रदेशचे राज्यपाल बिस्वा भूषण हरिचंदन यांनी कार्यक्रमाची सोय केल्याबद्दल आणि त्यांना पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

नम्रताच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘जागतिक आरोग्य दिनानिमित्त ३० मुलांवर हार्ट सर्जरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन माननीय राज्यपाल श्री विश्वभूषण हरिचंदन यांनी केले होते. नम्रताने पुढे माहिती दिली की, वैद्यकीय उत्कृष्टता आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आंध्र हॉस्पिटलच्या टीमचे आभार. नम्रताने महेशच्या आर्थिक मदतीसह शस्त्रक्रिया करणाऱ्यात येणाऱ्या मुलांचे काही फोटोही शेअर केले.

महेश बाबूने २०१९ मध्ये आंध्र हॉस्पिटल आणि हिलिंग लिटल हार्टस् नावाच्या एनजीओसोबत हातमिळवणी केली होती. आतापर्यंत त्याच्या मदतीने १००० हून अधिक मुलांवर सर्जरी करण्यात आली आहे. त्याचे सहकलाकार आणि चाहते त्याच्या या कामाबद्दल नेहमी त्याचे कौतूक करत असतात.

महेश बाबूच्या फाउंडेशनने आता रेनबो चिल्ड्रेन्स हार्ट इन्स्टिट्यूट (RCHI) सोबत एक नवीन मोहिम सुरु केली आहे. अभिनेत्याने मुलांच्या हृदयाच्या काळजीसाठी RCHI येथे Pure Little Hearts Foundation (PLHF) सुरू केले आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, महेश बाबू फाउंडेशनच्या माध्यमातून PLHF मध्ये जन्मजात हृदयविकार असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या मुलांवर उपचार केले जातील.

महत्वाच्या बातम्या-
जोरात टॉयलेटला आली म्हणून मैदानातून काढला पळ, ‘या’ खेळाडूमुळे थांबवावा लागला सामना, पहा व्हिडीओ
शेतकऱ्यांनो! आता वीज तोडली तरी घाबरायचं नाय, पठ्ठ्याने आणलाय भन्नाट जुगाड, ट्रॅक्टरपासून होतेय वीजनिर्मिती
औरंगबादेच्या महाराजांचा सेक्स व्हिडीओ झाला व्हायरल, वारकरी सांप्रदायाने केली कारवाईची मागणी

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now