महाविकास आघाडीने आता आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर काही तासांपुर्वी गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्यावर गुन्हा दाखल होताच आता भाजपच्या आणखी एका नेत्यावर गुन्हा दाखल झाला आहे. माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना महाविकास आघाडीने झटका दिला आहे.
बावनकुळेंच्या कार्याकाळात झालेल्या कामकाजांची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. महावितरणाकडून करण्यात आलेल्या कामांचा यामध्ये समावेश आहे. या चौकशी समितीमुळे अशी शक्यता वर्तवली जात आहे की चंद्रशेखर बावनकुळे अडचणीत येऊ शकतात.
या चौकशीसाठी महावितरण कंपनीच्या तीन संचालकांची निवड करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष महावितरणाचे वित्त संचालक असणार आहेत. तसेच या समितीमध्ये संचलन विभागाचे संचालक आणि कार्यकारी संचालक यांचाही सहभाग आहे. चौकशी केल्यानंतर साधारण एक महिन्यात समितीचा अहवाल हाती येणार आहे.
हा अहवाल सरकारकडे सादर केला जाणार आहे. आज सकाळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबई बँक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर महाविकास आघाडीने दुसरा झटका देत चंद्रशेखर बावनकुळे यांना दुसरा झटका दिला. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात महावितरण कंपनीद्वारे पायाभूत प्रकल्प उभारण्यात आले होते.
त्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे उर्जामंत्री होते. या प्रकल्पांची चौकशी आता होणार आहे. ते उर्जामंत्री असताना वीज यंत्रणेला मजबूत बनवण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च झाला आहे आणि अनेक कामेही झाली आहेत. यादरम्यान, राज्य सरकार, महावितरण कंपनी, जिल्हा नियोजन मंडळ, केंद्र सरकार तसेच अन्य अनेक ठिकाणांहून कोट्यावधींचा निधी मिळाला होता. त्या निधीतून जी कामे झाली त्यांची चाचपडताळणी होणार आहे.
त्यामध्ये उपकेंद्र उभारणीपासून ते रोहित्र आणि नव्या वाहिन्या टाकण्यापर्यंतच्या कामांचा समावेश आहे. याबाबत अनेक तक्रारीही आल्या होत्या. त्यामुळे याची चौकशी करण्याचा निर्णय आता राज्य सरकारने घेतला आहे. या चौकशीदरम्यान बावनकुळेंचीही चौकशी होणार हे आता स्पष्ट झाले आहे. देवेंद्र फडणवीसांनी सोमवारी विधानसभेत भिती व्यक्त केली होती की आता भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल होतील तेच आता घडत आहे. दरेकरांनंतर दुसऱ्या तिसऱ्या नेत्यांना अडकवण्यात येईल असेही ते म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
नोकरी आणि लग्नाच्या अमिषापोटी ज्ञानेश्वर झाला शहजाद, केलं दोनदा धर्मांतर; बीडमधील घटना चर्चेत
मी कर्जबाजारी आहे, माझ्या जागी दुसरा असता, तर जीव दिला असता; ‘लॉकअप’ मध्ये प्रसिद्ध अभिनेत्याचा खुलासा
..मग बघू कोण PSL सोडून IPL खेळायला जातंय, PCL अध्यक्षांचे BCCI ला खुल्ले चॅलेंज
तब्बल ९ वर्षांनंतर अमृता रावने शेअर केले लग्नाचे ‘ते’ खास फोटो, वेडिंग लुक पाहून चाहते घायाळ