Share

महाविकास आघाडीने भाजपचा उडवला धुव्वा, नगरपंचायतीत मिळवल्या सर्वात जास्त जागा

सध्या राज्यात नगरपंचायत निवडणुकीचीच चर्चा सुरू आहे. राज्यातील ३२ जिल्ह्यांच्या १०६ नगरपंचायतींमधील १८०२ जागांचा निकाल हाती लागला असून आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार भाजप हा राज्यात एक नंबरचा पक्ष ठरला आहे. भाजपनंतर राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचा नंबर आहे.

आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार भाजपला सर्वात जास्त म्हणजे ३७९ जागांवर यश मिळाले आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने ३५९ जागांवर विजय मिळवला आहे. तिसऱ्या नंबरवर शिवसेनेने २९७ जागांवर विजय मिळवला आहे. त्यानंतर काँग्रेसने २८१ जागांवर विजय मिळवला आहे आणि इतर २५३ जागांवर विजय मिळवला आहे.

वास्तविक तसं बघायचं झालं तर नगरपंचायत निवडणुकीत भाजप हा एक नंबरचा पक्ष ठरला आहे. पण महाविकास आघाडीने सगळ्यात जास्त जागांवर वर्चस्व प्रस्थापित केल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीला ९३७ जागांवर यश मिळाले आहे. मतमोजणी असूनही सुरू आहे.

निवडणुकीचा निकाल आज संध्याकाळपर्यंत आपल्या हाती येईल. पण महाविकास आघाडीने भाजपला मोठा धक्का दिल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी भाजपचा डंका वाजला आहे तर काही ठिकाणी महाविकास आघाडीने भाजपचा दारूण पराभव केला आहे. भाजपने बीड जिल्ह्यात झेंडा रोवला आहे.

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पैकी तीन नगर पंचायती आमदार सुरेश धस यांनी मोठ्या फरकाने जिंकल्या आहेत. केवळ वडवणी नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादीने झेंडा रोवला आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

औरंगाबादेत भाजपचे दिग्गज नेते रावसाहेब दानवे यांना धक्का देण्यात शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांना यश आले आहे. दर दुसरीकडे नांदेडमध्ये वेगळंच चित्र पाहायला मिळालं. अमरावतीत मंत्री यशोमती ठाकूर यांनी त्यांचं वर्चस्व कायम ठेवल्याचं पाहायला मिळालं. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या बाबतीतही असंच चित्र पाहायला मिळालं आहे.

महत्वाच्या बातम्या
प्रत्येक मंदिरात घंटा का असते? घंटेचा आवाज ऐकल्याने आपल्या मेंदूवर त्याचा काय परिणाम होतो?
रिअ‍ॅलिटी शोमध्ये मोदींची खिल्ली उडवल्याने सरकार संतापेल; मीडिया हाऊसला पाठवली नोटीस
पुण्यातून अपहरण झालेला डुग्गू अखेर १० दिवसांनी सापडला; ३०० पोलीस घेत होते शोध
शेवटी ते आबांचच रक्त…! विरोधकांचा धुव्वा उडवल्यावर रोहीत पाटलांचे पवारांकडून तोंडभरून कौतूक

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now