तब्बल दोन वर्षानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार यंदा पाहायला मिळाला. कोरोनामुळे गेले दोन वर्ष सर्व काही थांबवण्यात आले होते. साताऱ्यामध्ये यंदा ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेला भरवण्यात आली होती. दोन वर्षानंतर ही स्पर्धा होत असल्याने या स्पर्धेत कोणता पैलवान महाराष्ट्र केसरी बनणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. (maharshtra kesari prithviraj patil did not get any prize)
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या पैलवानानं बाजी मारली आहे. महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विरूद्ध मुंबई पूर्वचा विशाल बनकर यांच्यात तगडी लढत झाली. या लढतीत कोल्हापूरच्या पृथ्वीराजनं बाजी मारत २१ वर्षानंतर कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीची मानाची गदा मिळवून दिली.
असे असतानाच आता या स्पर्धेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईच्या प्रकाश बनकरला आस्मान दाखवत मानाची गदा मिळवणाऱ्या पृथ्वीराज पाटीलने स्पर्धेनंतर आपल्याला बक्षीसच न मिळल्याची खंत बोलून दाखवली आहे. त्याच्या या विधानाने एकच खळबळ उडाली आहे.
अवघ्या १९ वर्षाच्या पृथ्वीराजनं कोल्हापूरचं नाव मोठं केलं आहे. पण त्याला बक्षीस न मिळाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आहे. साताऱ्यात झालेली ही उपेक्षा गंभीर असल्याचे बोलले जात आहे. या प्रकारावर जागतिक कुस्ती स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या सोनबा गोंगाने याने सुद्धा आवाज उठवला आहे.
कुस्ती खेळणारे मल्ल हे गरीब कुटुंबातून येत असतात. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना रोख रक्कम दिली गेली पाहिजे, असे मत सोनबा गोंगाने याने वक्त केले आहे. तसेच यावर आता राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी आता गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पृथ्वीराज पाटील याला बक्षीस देणे गरजेचे आहे. जर हे दिले गेले नसेल तर नक्कीच बक्षीस का दिले गेले नाही? याची माहिती घेतली जाईल. मल्ल प्रचंड मेहनीने हा किताब मिळवतात. बक्षीस देण्याची जबाबदारी जर शासनाची असेल तर शासनाकडून हे बक्षीस दिलं जाईल. जर हे बक्षीस आयोजकांकडून असेल तर त्यांना याबाबत सुचना दिल्या जातील, असे शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
पहा राज ठाकरेंच्या नातवाची पहिली झकल; फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल
हिंदुत्ववादी संघटनेकडून गरीब मुस्लिम व्यक्तीच्या पोटावर पाय; कलिंगडांचा पाडला खच, संतापजनक VIDEO व्हायरल
अंजलीसोबत झाला धोका, ज्याला प्रपोज केलं तो निघाला एका मुलाचा बाप; कंगनाने केली पोलखोल