Share

शिवबंधन बांधणार की नाही? राजे म्हणाले, ‘आमचं ठरलंय’!, वाचा नेमकं राजेंच्या मनात आहे तरी काय..

udhav thackeray

राजकीय वातावरण तापलेलं असतानाच राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शिवसेना प्रवेशाची अट माजी खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhaji raje) यांना घालण्यात आली आहे. यासाठी शिवसेने संभाजी राजे यांना अल्टीमेटम देखील दिला होता.

मात्र आता शिवसेनेने संभाजी राजे यांना दिलेला अल्टीमेटम संपला आहे. राज्यसभेसाठी उत्सुक असलेले कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स आजही कायम आहे. तर दुसरीकडे  ‘शिवसेना राज्यसभेच्या दोन्ही जागा लढवणार आहे. दोन्ही जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून येणार,’ असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

संभाजीराजे आपला निर्णय जाहीर करण्यापूर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशीदेखील चर्चा करण्याची शक्यता आहे. तसेच आज संभाजी राजे मुंबईच्या दिशेने रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे ते शिवसेनेत प्रवेश घेणार की नाही हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

याचबरोबर संभाजी राजे शिवसेना प्रवेशाला नकार देत अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी सविस्तर चर्चा झालेली आहे. पुढे काय करायचं ते ठरलेलं आहे. मला विश्वास आहे ठरल्याप्रमाणे ते करतील, ते छत्रपती घराण्याचा मान ठेवतील,’ असा विश्वास संभाजी राजे यांनी व्यक्त केला आहे.

आज संभाजीराजे छत्रपती यांनी पॅलेसमध्ये मालोजीराजे यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना ही माहिती दिली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे छत्रपती यांनी सहावी जागा ही आपल्याला द्यावी, अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा केली होती.

दरम्यान, तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी `प्लॅन बी` आखल्याची चर्चा सध्या सुरू आहे. संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिला तर उद्धव ठाकरे यांनी `प्लॅन बी` आखला आहे. ठाकरेंनी सहाव्या जागेसाठी आता शिवसेनेच्या ग्रामीण भागातील नेत्याला राज्यसभेची उमेदवारी देण्याचे त्यांनी जवळपास निश्चित केले आहे.

ठाकरेंनी आखलेल्या या ‘प्लॅन बी’ मध्ये माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे नाव आघाडीवर असल्याच समजत आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याही नावाचा यामध्ये समावेश असल्याच समजत आहे. मिलिंद नार्वेकर यांचे नाव यामध्ये असल्याच समजत आहे. नार्वेकर हे उद्धव ठाकरेंच्या जवळचे मानले जातात.संभाजीराजे यांनी शिवसेनेत येण्यास अधिकृत नकार दिल्यास या नावांपैकी एक नाव हे शिवसेनेकडून राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी देणार येणार असल्याच बोललं जातं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
शिवसेनेच्या ‘त्या’ निर्णयामुळे संभाजीराजे कोंडीत, आता उरलाय एकच आधार तो म्हणजे ‘फडणवीस’
नवनीत राणा संसदीय समितीसमोरही ढसाढसा रडल्या; म्हणाल्या, ‘आता तुम्हीच न्याय द्या!’
जुळे असल्याचा घेतला गैरफायदा, भावाच्या पत्नीसोबत केलं धक्कादायक कृत्य; वाचून पायाखालची जमीन सरकेल
सारा तेंडुलकरने लग्नात मराठमोळ्या अंदाजात पार पाडले सगळे विधी, फोटोंनी उडाली खळबळ

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now