narendra modi : महाराष्ट्र – कर्नाटक सीमा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा वाद मिटविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अद्याप हा वाद मिटला नाहीये. तर आता अशातच एक मोठी बातमी समोर येतं आहे. लवकरच महाराष्ट्र – कर्नाटक सीमा वाद मिटणार असल्याच बोललं जातं आहे.
महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमेला लागून असलेल्या दोन्ही राज्यांतील जिल्ह्यांच्या प्रश्नाबाबत आज कोल्हापुरात समन्वय बैठक होणार आहे. बैठकीला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत उपस्थित राहणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी विद्यापीठाच्या सभागृहात ही बैठक पार पडणार असून सकाळी अकराला ही बैठक सुरू होईल. विशेष बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीबाबत सूचना दिल्या होत्या. मोदींच्या सुचनेनुसार ही बैठक आज होतं आहे.
एवढंच नाही तर, आज होणाऱ्या या बैठकीत सीमाप्रश्नासह अलमट्टी धरण, हत्तींच्या विषयांवर चर्चा होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूरसह सांगलीला महापुराचा सामना करावा लागत आहे. सध्या या धरणाची ५१७ मीटर असलेली उंची वाढवून ती ५१९ मीटर करण्याचा घाट कर्नाटक सरकारने घातला आहे.
दरम्यान, यावर आजच्या बैठकीत काय चर्चा होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याशिवाय जंगली हत्तींचा प्रादुर्भाव, आजरा तालुक्यातील किटवडे प्रकल्प, गोव्यातून होणारी अवैध मद्य तस्करी, लम्पी आजार हे मुद्दे महाराष्ट्राकडून या बैठकीत मांडले जाणार असल्याच देखील बोललं जातं आहे.
तसं पाहायला गेलं तर, बेळगाव सीमाप्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच या प्रश्नात मध्यस्थी केली आहे. आज होणाऱ्या बैठकीच्या माध्यमातून अनेक दशकांपासून सुरू असलेल्या बेळगाव सीमाप्रश्नावर तोडगा निघणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
Indian Team : पाकिस्तानच्या विजयाने भारताचं टेंशन वाढलं, सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी उरलाय फक्त ‘हा’ एकमेव मार्ग
Vaishali Suryavashi : खबरदार! यापुढे माझ्या वडीलांचा फोटो लावला तर…; शिंदेगटातील आमदारावर बहीण भडकली
Team India : ‘हे’ पाच खेळाडू ठरलेत टीम इंडियाच्या विजयाचे हिरो; भन्नाट खेळी खेळत राखली संघाची लाज