राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल असं वादग्रस्त वक्तव्य केलं. तसेच राज्यपालांच्या या वक्तव्यावरून वाद पेटला आहे. राज्यपालांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आज पुण्यात आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.
औरंगाबादेत समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्यपाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव, मराठी राजभाषा दिन आणि श्री दास नवमी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी येथे बोलताना कोश्यारी यांनी हे विधान केले आहे.
ते म्हणाले, ‘समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल?’ असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. आपल्या देशात गुरुची परंपरा आहे. ज्याला गुरू मिळाला तो यशस्वी होतो असंही कोश्यारी म्हणाले. यामुळे आता राजकीय वर्तुळात आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे.
“महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचं मोठं योगदान असतं, तसंच आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान असतं. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं की तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं असल्याचे कोश्यारी यांनी म्हंटले आहे.
तर दुसरीकडे, राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत असून आज पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच संभाजी ब्रिगेड कडून देखील राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येणार आहे. कोश्यारी यांच्या या विधानावरुन नव्या वादाला तोंड फुटले आहे.
तसेच राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागावी. तसेच आपले विधान मागे घ्यावे. असं केलं नाहीतर त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करू, असं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले आहे. याचबरोबर सोशल मीडियातून देखील राज्यपालांवर टीकेचा भडिमार होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी! संभाजीराजेंना सरकारकडून चर्चेसाठी निमंत्रण; वर्षा बंगल्यावर पार पडणार बैठक
‘अजेंडा रेटण्यासाठी खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला तर..’, रोहित पवार राज्यपालांवर भडकले
मोठी बातमी! उपोषणामुळे संभाजीराजेंची प्रकृती बिघडली, डॉक्टरांना औषधे घेण्यास दिला नकार
‘पुष्पा’ च्या श्रीवल्ली गाण्यावर रितेश करत होता डान्स; जेनेलियाने हिमेश रेशमियाच्या गाण्याचा असा दिला तडका