महाबळेश्वर फिरण्यासाठी येणाऱ्यांकडे इलेक्ट्रिक वाहने आवश्यक; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

पावसाळा म्हटलं की पर्यटन स्थळी गर्दी होताना दिसते. महाराष्ट्रात महाबळेश्वर हे एक मोठे पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे पावसाळा सुरु होताच या ठिकाणी गर्दी होण्यास सुरुवात होते. आता या पर्यटन स्थळाबाबत महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन्ही पालिकांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. (mahabaleshwar corporation shocking decision)

महाबळेश्वर, पाचगणी या पर्यटनस्थळावरी विविध पॉईंट्स आणि प्रेक्षणीय स्थळांवर फिरायला जाण्यासाठी यापुढे विद्युत उर्जेवरील वाहने आवश्यक असणार आहे. या स्वरुपाचा प्रस्ताव दोन्ही पालिकांनी तयार करुन तो अंतिम मंजूरीसाठी पर्यटन मंत्रालयात पाठवला आहे.

महाबळेश्वर आणि पाचगणी येथे रोज हजारो इंधनावरील वाहने येत असतात. यामुळे वाहतूक कोंडी तर होतेच, पण त्यातून निघणाऱ्या धुरापासून वायुप्रदूषणही होते. या वायुप्रदुषणामुळे तिथल्या निसर्गाला मोठा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे पालिकांनी याबाबत निर्णय घेतला आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच वायुप्रदुषण टाळण्यासाठी दोन्ही महापालिकांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. महाबळेश्वर आणि पाचगणी येथे फिरायला येताना फक्त विद्युत उर्जेवर धावणाऱ्या वाहनांनाच परवानगी द्यावी, असा प्रस्ताव पालिकांनी पर्यटन मंत्रालयात मांडला आहे.

तसेच या प्रस्तावानुसार येथे पर्यटक आपली इंधनावरील वाहने आणू शकतील. पण त्यांना ती वाहनतळावरच लावावी लागणार आहे. म्हणजेच पर्यटक आपली पेट्रोल-डिझेलवर धावणारी वाहने महाबळेश्वर आणि पाचगणी येथे आणू शकतील, पण त्यांना ती वाहनतळावरच लावावी लागणार आहे, ती वाहने पर्यटन स्थळावर नेता येणार नाही.

या प्रस्तावावर महाबळेश्वराच्या मुख्याधिकारी पल्लवी भोरे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. महाबळेश्वर, पाचगणी, या निसर्गरम्य स्थळांच्या पर्यावरण संरक्षणासाठी हा प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे आता येथे फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांकडे किंवा व्यवसाय करणाऱ्यांकडे इलेक्ट्रिक वाहने असणे आवश्यक राहील. असा प्रस्ताव पर्यटन मंत्रालयाला पाठवण्यात आला आहे, असे पल्लवी भोरे पाटील यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
बड्या पक्षाच्या आमदाराने स्वत:च्याच लग्नात लावली गैरहजेरी, संतापलेल्या नवरीने उचललं ‘हे’ धक्कदायक पाऊल
बिचुकलेंनी सांगितलं राष्ट्रपदीपदाच्या निवडणुकीचं गणितं; ‘पवार साहेबांनी पाठिंबा दिला तर…’
भावा तूच रे! दिवसा विकायचा बर्फाचे गोळे, रात्री करायचा अभ्यास, १० वीला पाडले ८१ टक्के