Share

Madhuri dixit : माधुरी दीक्षितने बॉलीवूडचा खरा चेहरा आणला समोर; सांगितला ‘हा’ लाजिरवाणा प्रकार

Madhuri dixit | बॉलीवूड चित्रपटांमध्ये इंटीमेट सीन्स नेहमीच असतात. असे सीन असणे यात काही नवीन गोष्ट नाही. पण हे सीन शुट करताना कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. खास करून त्या चित्रपटातील अभिनेत्रींना.

चित्रपटामध्ये स्क्रिप्टची गरज असेल तर अनेक अभिनेत्री बोल्ड सीन्स द्यायला तयार असतात. पण हे सीन्स शुट करताना मात्र त्यांच्या नाके नऊ येतात. कारण अनेक वेळा असे सीन्स शुट करत असताना अभिनेते त्यांच्याशी वाईट पध्दतीने वागतात.

असाच काही किस्सा बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितसोबत झाला आहे. तिने एक चित्रपट साइन केला होता. पण या चित्रपटात अनेक बोल्ड सीन्स होते. स्क्रिप्टची डिमांड होती म्हणून माधुरी दीक्षितने बोल्ड सीन्स करण्यास होकार दिला.

या चित्रपटामध्ये माधुरी दीक्षितसोबत विनोद खन्ना मुख्य भुमिकेत होते. या चित्रपटासाठी दोघांनीही खुप जास्त मेहनत केली होती. कारण माधुरी दीक्षित बॉलीवूडमध्ये नवीन होती. तर विनोद खन्ना अनेक वर्षांनंतर कमबॅक करत होते.

चित्रपटाची पुर्ण तयारी झाली होती. चित्रपटाची शुटिंग सुरू झाली. त्या दिवशी माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांचा इंटीमेट सीन शुट करायचा होता. या दोघांमध्ये किसिंग सीन होता. हा सीन शुट करताना विनोद खन्ना माधुरीच्या ओठांवर चावले. त्यामुळे तिला मोठा धक्का बसला होता.

माधुरी दीक्षितने स्वतः एका मुलाखतीमध्ये या गोष्टीचा खुलासा केला होता. ती म्हणाली की, ‘किसिंग सीन सुरू झाल्यानंतर सुरुवातीला सगळे काही ठीक होते. पण नंतर मात्र विनोद खन्ना यांनी माझ्या ओठांना चावायला सुरुवात केली. हे सगळं सुरू असताना चित्रपटाचे दिग्दर्शक कट बोलत नव्हते’.

माधुरी दीक्षितने पुढे सांगितले की, ‘या सर्व प्रकारामुळे मी खुप जास्त घाबरले होते आणि मी रडायला सुरुवात केली होती. त्यासोबतच मला सर्वांचा राग देखील आला होता. कारण कोणीही काहीही बोलत नव्हते. सर्वजण शांतपणे बघत होते’.

या घटनेनंतर विनोद खन्ना यांनी माझी माफी मागितली होती. पण माफी मागून या गोष्टी विसरता येत नाहीत. माझी आणि विनोद खन्नाची खुप चांगली मैत्री होती. पण ती मैत्री कमी झाली. मी त्यानंतर चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स देणे बंद केले होते. पण याने प्रश्न सुटणार नाही. असे देखील माधुरीने सांगितले.

बॉलीवूडमध्ये हा प्रकार पहिल्यांदा झाला नाही. या अगोदर देखील असे अनेक वेळा झाले आहे. पण तरीही या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाते. म्हणून आजही बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्री या गोष्टींची तक्रार करत असतात.

महत्वाच्या बातम्या
Ajay atul: ‘चंद्रा’मुळे व्हायरल झालेल्या नगरच्या चिमुकल्या जयेशचे नशीबच पालटले; अजय अतुलने दिली मोठी संधी
Bindass kavya : बिंदास काव्याचं भांडं फुटलं! फॉलोवर्स वाढवण्यासाठी स्वत:च झाली बेपत्ता, घरच्यांनीही केली मदत
madhukar pichad : मधुकर पिचडांचा गड ढासळला; २८ वर्षांची सत्ता संपुष्टात, राष्ट्रवादीने दिला धोबीपछाड
VIDEO: विराट कोहलीच्या धमाकेदार खेळीवर रोहितही झाला फिदा, दिली ‘जादू की झप्पी’

ताज्या बातम्या बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now