Share

VIDEO: मुंबईच्या गगनचुंबी इमारतीत माधूरीने बांधले अलिशान घर; पहा नव्या घराची खास झलक

धक धक गर्ल माधुरी दीक्षित ही सदाबहार अभिनेत्री आहे. माधुरीने इंडस्ट्रीत काम करून नाव कमावले आहे. ही अभिनेत्री ५४ वर्षांची झाली असली तरी या वयातही ती लोकांच्या हृदयात धडधडताना दिसून येते. नुकतीच तिची वेब सिरीज रिलीज झाली, ज्यामध्ये लोकांना तिच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा पाहायला मिळाली. (madhuri dixit new house video)

आता माधूरी पुन्हा एकचा चर्चेत आली आहे. बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने मुंबईत ५५०० स्क्वेअर फूटमध्ये भाड्याने फ्लॅट विकत घेतला आहे. हे मुंबईच्या वरळी भागात असून माधूरीचा हा फ्लॅट २९ व्या मजल्यावर आहे, या ठिकाणी रात्रीच्या वेळी मुंबई खुपच सुंदर दिसते असे म्हटले जाते.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथून अगदी समोरच समुद्राचं एक अनोखं रुपही दिसतं. रिपोर्ट्सनुसार, माधूरी दीक्षितने हे घर भाड्यावर घेतले आहे, ज्याचे महिन्याचे भाडे १२.५ लाख रुपये आहे. हा फ्लॅट वास्तुविशारद अपूर्व मेहता यांनी अवघ्या ४५ दिवसांत तयार केला आहे.

सध्या घराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामध्ये तुम्ही माधूरीचे घर आतून कसे दिसते हे बघू शकतात. याबाबतचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बॉलिवूड शादीस यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये माधूरीचे अलिशान घर दिसून येते.

माधूरीचे हे घर खुपच अलिशान आहे. तिच्या घरातील लिव्हिंग रुम पलंग आणि टेबलांसह खुप प्रशस्त दिसतो. इतकंच नाही, तर डायनिंग टेबलही खुप मोठा आहे. जिथे बरेच लोक एकत्र बसून जेवण करु शकतात. माधूरीने तिच्या घरातील एका रुमला म्युजिक रुम बनवला आहे.

माधूरीच्या म्युजिक रुममध्ये गिटारपासून पियानोपर्यंत सर्व वाद्ये दिसून येत आहे. तिचे घर तपकिरी, गडद हिरवा, पांढरा यांसारख्या अनेक रंगानी सजलेले आहे. तसेच घरातील आतील भागावर काही आकर्षक पेंटिंग्सही लावण्यात आलेल्या आहे. हे घर २९ व्या मजल्यावर असल्यामुळे तिथल्या खिडकीतून दिसणारे दृश्य हे अद्भूत आहे.

महत्वाच्या बातम्या-
अरे देवा! कोर्टाने भगवान शंकरालाच बनवले आरोपी, कोर्टात हजर राहण्याची दिली नोटीस, मग भक्तांनी..
‘तू तेव्हा तशी’ मालिकेत चित्रलेखाची भूमिका साकारणार प्रसिद्ध अभिनेत्याची लेक; बहीणही आहे फेमस अभिनेत्री
एकदम रॉयल जीवन जगते अर्चना पुरन सिंग, फक्त खुर्चीवर बसून हसण्याचे घेते तब्बल एवढे रुपये

ताज्या बातम्या बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now