Share

माधूरी दीक्षितने आलिशान घर घेतलं भाड्याने; महिन्याचं भाडं ऐकून डोळे होतील पांढरे

धक धक गर्ल माधुरी दीक्षित ही सदाबहार अभिनेत्री आहे. माधुरीने इंडस्ट्रीत काम करून नाव कमावले आहे. ही अभिनेत्री आज ५४ वर्षांची झाली असली तरी या वयातही ती लोकांच्या हृदयात धडधडताना दिसून येते. नुकतीच तिची वेब सिरीज रिलीज झाली, ज्यामध्ये लोकांना तिच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा पाहायला मिळाली. (madhuri dixit new apartment)

आता माधूरी पुन्हा एकचा चर्चेत आली आहे. बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने मुंबईत ५५०० स्क्वेअर फूटमध्ये तिने भाड्याने फ्लॅट विकत घेतला आहे. हे मुंबईच्या वरळी भागात असून माधूरीचा हा फ्लॅट २९ व्या मजल्यावर आहे, या ठिकाणी रात्रीच्या मुंबई खुपच सुंदर दिसते असे म्हटले जाते.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथून अगदी समोरच समुद्राचं एक अनोखं रुपही दिसतं. रिपोर्ट्सनुसार, माधूरी दीक्षितने हे घर भाड्यावर घेतले आहे, ज्याचे महिन्याचे भाडे १२.५ लाख रुपये आहे. हा फ्लॅट वास्तुविशारद अपूर्व मेहता यांनी अवघ्या ४५ दिवसांत तयार केला आहे.

घराची संपूर्ण रचना माधुरी आणि तिचे पती श्रीराम नेने यांच्या मनाप्रमाणे आहे. माधूरीचा फ्लॅट चांगलाच चर्चेत आला आहे कारण हा फ्लॅट त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे तयार करुन घेतला आहे. या फ्लॅटचे व्हिडिओ आणि फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. याचे महिन्याचे भाडे अनेकांना हैराण करत आहे. कारण एवढ्या भाड्यात सामान्य माणूस एखादी कार खरेदी करु शकतो.

दरम्यान, माधुरी दीक्षितचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती जॅकी श्रॉफसोबत डान्स करताना दिसत आहे. दोघेही १९९१ मध्ये आलेल्या १०० डेज’ चित्रपटातील ‘सुन बेलिया शुक्रिया मेहराबानी’ या गाण्यावर डान्स करताना दिसले होते. माधुरी दीक्षितने पोस्टवर जॅकी श्रॉफला टॅग केले होते.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर माधुरी दीक्षित नुकतीच ‘द फेम गेम’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती, ज्यामध्ये तिने अनामिका नावाच्या अभिनेत्रीची भूमिका साकारली होती, जी म्हणायला मोठी स्टार आहे, पण तिच्या आयुष्यात काहीच ठिक नाहीये. या सिरीजमध्ये माधुरीशिवाय संजय कपूर, मानव कौल, गगन अरोरा यांच्यासह अनेक स्टार्स आहेत.

महत्वाच्या बातम्या-
‘पार्थ पवार हेलिकॉप्टरने फिरण्या पलीकडे काही करत नाही, हा पुण्याचा पेंग्विन,’ भाजपाची जहरी टीका
युद्धादरम्यान रशियामध्ये कंडोमची विक्री प्रचंड वाढली; धक्कादायक कारण आले समोर
‘हा’ खेळाडू बनणार का RCB चा लकीचार्म? आजवर ज्या ज्या संघात खेळला ती टिम ठरलीय चॅम्पीयन

ताज्या बातम्या बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now