Share

‘या’ दिग्गज क्रिकेटरसोबत होते माधुरी दीक्षितचे अफेअर; ब्रेकअपचं कारण ऐकून धक्का बसेल

Madhuri Dixit

वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी ‘धकधक गर्ल’ अभिनेत्री माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) आपल्या कारकिर्दीची सुरूवात राजश्रीच्या ‘अबोध’ या चित्रपटातून केली होती. कोट्यवधी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री माधुरी एके काळी क्रिकेटर अजय जडेजाच्या प्रेमात पडली होती.

संजय दत्त आणि माधुरी दीक्षितची प्रेमकहाणी बॉलिवूडमध्ये चर्चेत होती. संजय दत्त व्यतिरिक्त माधुरी दीक्षितचे नाव क्रिकेटर अजय जडेजासह इतर अनेक सेलिब्रिटींसोबत जोडले गेले होते. ९० च्या दशकात अजय जडेजा आणि माधुरी दीक्षित यांच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत होत्या.

माधुरी दीक्षित आणि अजय जडेजा यांची पहिली भेट एका फोटोशूट दरम्यान झाली होती. त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्या समोर येऊ लागल्या. अफेअरची बातमी समोर आल्यानंतर अशी चर्चा सुरू झाली की, दोघेही लवकरच एका चित्रपटात दिसणार आहेत. माधुरी दीक्षितने एका निर्मात्याला अजय जडेजाला चित्रपटात कास्ट करण्याची शिफारसही केली होती.

अजय जडेजाला हा चित्रपट मिळणार होता, पण त्याच्या एका चुकीने सारे काही बदलून गेले. मात्र, नंतर अजय जडेजाला चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि लोकांनी त्यांना पसंतीही दिली. जेव्हा अजय जडेजा त्याच्या करिअरमधील वाईट टप्प्यातून जात होता, तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी त्याला क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला होता.

अजय जडेजा एका राजघराण्यातील होता, तर माधुरी दीक्षित मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबातील होती. अशा स्थितीत त्याच्या कुटुंबीयांना त्यांचे नाते मान्य नव्हते. अजय जडेजा आणि माधुरीचा १९९९ मध्ये ब्रेकअप झाला आहे. त्यावेळी अजय जडेजाचे नाव मॅच फिक्सिंगमध्ये आले होते.

माधुरी दीक्षितनेही अजय जडेजासोबतचे सर्व संबंध तोडले होते. सुरुवातीच्या काळात माधुरीच्या कुटुंबीयांना अजय जडेजासोबत कोणतीही अडचण नव्हती, पण मॅच फिक्सिंगमध्ये त्याचे नाव आल्यानंतर त्यांनी आपल्या मुलीला त्याच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. यानंतर माधुरी दीक्षितने श्रीराम माधव नेने यांच्याशी लग्न केले आणि काही काळासाठी अमेरिकेला शिफ्ट झाली.

महत्वाच्या बातम्या
रोहित शर्माने भर मैदानात इशान किशनवर उचलला हात; कारण ऐकून व्हाल हैराण, पहा व्हिडिओ
15 कोटींसाठी केला अभिनेते सतीश कौशिक यांचा खून, फार्महाऊसच्या मालकानेच केला घात
फक्त ७५ घरे असलेल्या ‘या’ गावाने देशाला आजवर दिलेत ४७ IAS आणि IPS अधिकारी; वाचा त्या गावाची भन्नाट स्टोरी

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now