Madhuri dixit : माधूरी दिक्षीत एक खुप चांगल्या अभिनेत्री आहेत. त्यासोबतच त्या खुप चांगल्या माणूस पण आहे. त्यांनी नेहमी त्यांच्या मित्रांना आणि फिल्म इंडस्ट्रीतील अनेकांना मदत केली आहे. त्यांच्या याच स्वभावामूळे सर्वजण त्यांना खुप पसंत करतात. माधूरी दिक्षीत तेव्हाच्या टॉपच्या अभिनेत्री होत्या. त्यामूळे त्यांच्याकडे कधीही टाईम नसायचा.
पण त्यांनी एवढ्या वेळूतून वेळ काढून देखील फिल्म इंडस्ट्रीतील मित्रांना मदत केली आहे. हा किस्सा आहे १९९० च्या ‘महासंग्राम’ या चित्रपटाचा. हा चित्रपटाची पुर्ण तयारी झाली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुकूल आनंद करत होते. या चित्रपटामध्ये विनोद खन्ना मुख्य भुमिकेत होते.
ओशोच्या आश्रमातून आल्यानंतर ते या चित्रपटामध्ये काम करत होते. त्यासोबतच गोविंदा, शक्ति कपूर, सुरज पंचोली आणि डिंपल कपाडिया यांसारखे कलाकार या चित्रपटात काम करत होते. चित्रपटाची शुटींग सुरु व्हायला खुप कमी दिवस होते. पण अचानक डिंपल कपाडिया यांनी हा चित्रपट सोडला. त्यामूळे या चित्रपटाच्या निर्मात्यांना खुप टेन्शन आले होते.
कारण या चित्रपटाची पुर्ण तयारी झाली होती. या चित्रपटाला उशीर झाला असता. तर विनोद खन्ना यांनी चित्रपट सोडला असता आणि निर्मात्यांना विनोद खन्नासारखे मोठे कलाकार गमवायचे नव्हते. त्यामूळे त्यांनी या चित्रपटासाठी नवीन अभिनेत्रीचा शोध घेण्यास सुरुवात शोध केली. पण ज्या भुमिकेसाठी त्यांना अभिनेत्री हवी होती. ती भुमिका खुप छोटी होती. पण त्यांना त्या भुमिकेसाठा प्रसिद्ध अभिनेत्रीच हवी होती.
निर्मात्यांनी या अडचणीबद्दल राकेश नाथला सांगितले. राकेश नाथ माधूरी दिक्षीतचे मॅनेजर होते. ते माधुरीचे पुर्ण काम सांभाळत होते. असे बोलले जाते की, राकेश नाथमूळे माधूरी दिक्षीत एवढ्या मोठ्या सुपरस्टार झाल्या होत्या.
त्यांनी निर्मात्यांना सांगितले की, मी काहीतरी करतो. पण माधूरी तेव्हा खुप व्यस्त होत्या. कारण त्यांचे परींदा, राम लखन हे चित्रपट हिट झाले होते. त्यामूळे माधूरी तेव्हा खुप व्यस्त होत्या. राकेश नाथ यांनी माधूरीला सांगितले की, ‘तुम्ही हा चित्रपट साईन करा.
बाकी मी बघतो.’ त्यामूळे माधूरी दिक्षीत यांनी हा चित्रपट साईन केला. पण या चित्रपटासाठी माधूरी दिक्षीत शुटींग कधी करणार हा प्रशन निर्माण झाला होता. कारण त्यांच्या त्या खुप व्यस्त होत्या. पण तरीही माधूरी दिक्षीतने हा चित्रपट पुर्ण केला. कारण त्यांनी या पुर्ण चित्रपटाची शुटींग रात्री केली.
त्या दिवसा बाकी चित्रपटाच्या शुटींग करायच्या आणि रात्री ‘महासंग्राम’ या चित्रपटाची शुटींग करायच्या. माधूरी दिक्षीतने एका मुलाखतीमध्ये या गोष्टीचा खुलासा केला. त्या म्हणाल्या की, ‘मी हा चित्रपट फक्त विनोद खन्ना यांच्यासाठी केला होता. कारण ते बॉलीवूडमध्ये कमबॅक करत होते.’
माधूरी दिक्षीतने या चित्रपटात काम करुन फक्त विनोद खन्नाची मदत केली नाही. तर या चित्रपटाच्या निर्मात्यांची देखील मदत केली. त्यामूळे या चित्रपटाचे नुकसान झाले नाही. याच कारणामूळे माधूरी दिक्षीत यांना इंडस्ट्रीमध्ये एवढे पसंत केले जाते. म्हणूनच त्या बॉलीवूडच्या लेडी अमिताभ बच्चन आहेत.
महत्वाच्या बातम्या
shivsena : आनंद दिघेंना साक्षात्कार झाला अन् टेंभी नाक्यावर झाली दुर्गेश्वरी देवीची स्थापना, वाचा राजकीय इतिहास
Suryakumar Yadav: सिक्सर किंग सुर्यकुमारने एकाच सामन्यात धवनपासून रिझवानपर्यंत सगळ्यांना टाकले मागे, केले ‘हे’ विक्रम
KL Rahul: सुर्याचा नाद नाय! लाईव्ह मॅचमध्ये केएल राहुलसाठी सुर्याने केले ‘असे’ काम, चाहत्यांकडून होतंय कौतुक
Bacchu Kadu : बच्चू कडूंनी कानशिलात लगावलेल्या कार्यकर्त्याचे स्पष्टीकरण; म्हणाला, “तो व्हिडीओ….