प्रसिद्ध अभिनेत्री मधुबालाची मोठी बहीण कनीज बलसारा हिला तिच्या सुनेने वयाच्या ९६ व्या वर्षी घरातून हाकलून दिले आहे. तिला बळजबरीने ऑकलंडहून विमानाने मुंबईला पाठवण्यात आले आणि मुंबईत राहणारी त्यांची मुलगी परवीजलाही याची माहिती देण्यात आली नाही. (madhubala sister was thrown out of house)
२९ जानेवारी रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास कनीज बलसाराच्या सुनेने तिला पैसे आणि सामान न देता फ्लाइटमध्ये बसवले. कनीज मुंबई विमानतळावर उतरल्यावर विमानतळ प्राधिकरणाने तिच्या मुलीला याची माहिती दिली. ईटाईम्सच्या रिपोर्टनुसार, कनीज बलसाराच्या मुलीने दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे.
परवीजने सांगितले की, तिची आई कनीज १८-१९ वर्षांपूर्वी आपला मुलगा फारूकसोबत न्यूझीलंडला गेली होती, कारण तिचे त्याच्यावर खूप प्रेम होते. फारुकही त्याच्या आई-वडिलांच्या खूप जवळ होता, त्यामुळे त्याची आई त्याच्यासोबत न्यूझीलंडला गेली होती. तिने मुलाखतीत पुढे सांगितले की तो एक चांगला व्यक्ती होता आणि न्यूझीलंडच्या सुधार विभागात तो काम करत होता. फारुखचे त्याच्या आई-वडिलांवर खूप प्रेम होते, तर वहिनी समीना आपल्या आई-वडिलांचा तिरस्कार करायची.
परवीझने मुलाखतीत खुलासा केला की, वहिनी समीना आपल्या आई-वडिलांसाठी कधीच जेवण बनवत नाही, म्हणून फारुख आई-बाबांसाठी रेस्टॉरंटमधून जेवण आणत असे. एवढेच नाही तर समीनाची मुलगीही आई-वडिलांसोबत वाईट वागायची. समीनाने आईला घर सोडण्यास भाग पाडले आणि फ्लाइटमध्ये बसवले तेव्हा तिची मुलगीही तिच्यासोबत होती.
पुढे बोलताना परवीजने सांगितले की, पूर्वी ती सतत न्यूझीलंडला जायची आणि आई सुद्धा दोनदा भारतात आली पण तब्येतीमुळे ती गेली पाच वर्षे भारतात आली नाही. भावाने सांगितले होते की, वृद्धापकाळामुळे आईला प्रवास करण्यास त्रास होतो. तसेच जास्त उंचीवर श्वास घेण्यात अडचण येऊ शकते.
परवीझने पुढे सांगितले की, आमचा भाऊ फारुख यांचे निधन झाल्यापासून समीनाचा छळ अधिकच वाढला आहे. कनीज बलसारा विमानतळावर उतरली, तेव्हा तिच्याकडे आरटी पीसीआर चाचणीसाठी पैसे नव्हते. त्यानंतर विमानतळ प्राधिकरणाने परवीजला फोन करून याची माहिती दिली. परवीजने लगेच पैसे पाठवले.
कनीज बलसाराने परवीजला फोन केला होता. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, फारूकचे निधन झाले आहे, मी त्याचे अंत्यसंस्कार करुन आले आहे. मला खूप भूक लागली आहे. फारुकच्या निधनानंतर परवीझची वहिनी समिना हिने आईच्या सर्व पैशांसह सर्व दागिने स्वत:कडेच ठेवून घेतले होते.
महत्वाच्या बातम्या-
चार मुलांची आई गेली जुन्या प्रियकराला भेटायला; सकाळी नग्न अवस्थेत सापडला मृतदेह
सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडेंबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे बंडातात्या कराडकर आहेत तरी कोण?
कोरोनानंतर जगावर येणार ‘हे’ मोठे संकट; एका कीडा करणार संपूर्ण पृथ्वी नष्ट