शेती परवडत नसल्याचे म्हणत एका शेतकऱ्याने थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. शेतकऱ्याने लिहिलेल्या पत्राची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा होतं आहे. या शेतकऱ्याने चक्क शेती परवडत नसल्याने वाईन विकण्याची परवानगी द्या, अशी मागणी मुख्यमंत्री ठाकरेंकडे केली आहे.
शेतकऱ्याच्या या अजब मागणीने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. जयगुनाथ गाढवे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील निलज बु. या गावात जयगुनाथ गाढवे हे राहतात. 2021 साली झालेल्या चक्रीवादळात डोळ्यासमोर शेतकऱ्यांची धान्याची पीक भुईसपाट झाली होती.
पंचनामे झाले तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे. याचबरोबर मागील वर्षीपासून सरकारने धान्य उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देणं बंद केलं. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणखीनच वाढल्या आहेत. शेतात पीक घेताना खर्च मोठ्या प्रमाणत आणि त्यातून मिळणारे उत्पन्न कमी प्रमाणात मिळत आहे.
तर दुसरीकडे मुलांचा शैक्षणिक खर्च, कुटुंबाच्या आरोग्यावर होणारा खर्च हे सर्व शेतीच्या उत्पन्नामधून करणे शक्य होत नाही. आणि या अडचणींमुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. या सर्व परिस्थितीला कंटाळून जयगुनाथ गाढवे यांनी थेट मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र लिहिले आहे.
गाढवे यांनी पत्रात म्हंटले आहे की, ‘मुख्यमंत्री साहेब आपण किराणा दुकानात वाईन विकायची परवानगी दिली तशी मलाही कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी लवकरात लवकर वाईन विक्रीची परवानगी मिळावी,’ अशा आशयाचे पत्र त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.
दरम्यान, अजूनतरी यावर मुख्यमंत्री ठाकरेंची प्रतिक्रिया आलेली नसून सत्ताधारी नेत्यांनी उत्तर दिलेले नाहीये. मात्र गाढवे यांनी पाठवलेल्या पत्राची जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे. जयगुनाथ गाढवे यांनी हे पत्र स्पीडपोस्टने मुख्यमंत्र्यांना पाठवलं. आता सर्वांचे लक्ष मुख्यमंत्री ठाकरेंच्या उत्तराकडे लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
काही तासात ‘या’ जिल्ह्यात होणार गारपिटीसह मुसळधार पाऊस; हवामान विभागाने दिला इशारा
विधानसभा निवडणूक निकालानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतीत होणार वाढ? काय म्हणाले पेट्रोलियम मंत्री…
वहिनी आणि दीर आढळले रक्तबंबाळ अवस्थेत; दीराच्या प्रायव्हेट पार्टमधून येत होतं रक्त
फिल्ममेकरने कपिल शर्मावर लावले ‘हे’ गंभीर आरोप, संतप्त चाहत्यांनी केली शो बंद करण्याची मागणी