थंड पेय माणसाला ठंडा ठंडा कूल बनवतात. असं असलं तरी शहरांमध्ये बर्गर, पिझ्झा आदींसोबत ‘कोल्ड ड्रिंक’ पिण्याचीही प्रथा आहे. पण समजा, तुम्ही एखाद्या प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये पोहोचलात आणि तुमच्या कोल्डड्रिंकमध्ये जर पाल निघाली तर तुमचे काय होईल? साहजिकच… तुम्हाला ते पेय पिण्याची किळस येईल.
भीतीपोटी तुम्ही ते पेय फेकून द्याल. पण जगप्रसिद्ध मॅकडोनाल्डच्या फास्ट फूड चेनकडून ग्राहकाला अशा निष्काळजीपणाची अपेक्षा नाही. त्यामुळे गुजरातमधील अहमदाबाद येथील मॅकडोनाल्डच्या आउटलेटमध्ये एका ग्राहकाला पाल असलेले शीतपेय देण्यात आले, तेव्हा हे प्रकरण इंटरनेटवर पसरले.
कोल्ड्रिंकच्या ग्लासमध्ये पाल आढळल्यानंतर अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशनने (एएमसी) कारवाई करत मॅकडोनाल्डचे हे आउटलेट सील केले. मात्र, मॅकडोनाल्डच्या खाण्याच्या पदार्थांमध्ये अशा गोष्टी निघण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधी विंचू, अळी आणि बेडूक यांसारखे प्राणी त्यांच्या खाण्याच्या पदार्थांमध्ये निघाले आहेत.
शीतपेयाचे नमुने तपासणीसाठी पाठवले गेले आहेत. वृत्तानुसार, भार्गव जोशी नावाच्या ग्राहकाने सोशल मीडियावर मॅकडोनाल्डने दिलेल्या कोल्ड ड्रिंकमध्ये सापडलेल्या पालीचा फोटो शेअर केला होता, त्यानंतर AMC अधिकाऱ्यांनी कारवाई केली. असे सांगण्यात आले की ग्राहकाने AMC कडे तक्रार केली.
त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी देवांग पटेल यांनी अहमदाबादमधील ‘सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत’ चाचणीसाठी आउटलेटमधून थंड पेयांचे नमुने गोळा केले. यासोबतच याप्रकरणी पुढील कारवाई होईपर्यंत रेस्टॉरंटला तातडीने सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
एएमसीने सांगितले की ‘लार्ज पब्लिक हेल्थ सेफ्टी’ रेस्टॉरंट सील केले जात आहे. यासोबतच महापालिकेच्या परवानगीशिवाय पुन्हा सुरू करू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्याच वेळी, मॅकडोनाल्ड्सने या घटनेवर निवेदन जारी केले आहे.
मॅकडोनाल्ड्सने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही आमच्या ग्राहकांच्या सुरक्षिततेची आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतो. अहमदाबाद आउटलेटवर कथितपणे घडलेल्या घटनेची आम्ही चौकशी करत आहोत. दरम्यान, अनेक तपासण्यांनंतर, आम्हाला काहीही चुकीचे आढळले नाही. आम्ही चांगले कॉर्पोरेट सिडीझन असल्याने अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहोत.
https://twitter.com/Bhargav21001250/status/1528048928255488001?s=20&t=RrpmzXRD_19EYbHR4CVdYw
महत्वाच्या बातम्या
“कुठं फेडाल ही पापं? तुम्ही नरकातच जाल”; अजितदादांनी अधिकाऱ्यांना झाप झाप झापले
VIDEO: टाईट लेगीन्स घालून जान्हवी कपूर चालवत होती सायकल, झाली oops momment ची शिकार
केतकी चितळे आता पुरती अडकली; न्यायालयाच्या कठोर आदेशाने पाय आणखी खोलात
‘मुख्यमंत्र्यांनी छत्रपती घराण्याचा मान ठेवावा’; संभाजीराजेंनी एका वाक्यात संपवला विषय