आपल्या समाजात अनेक लोक असे आहेत जे खरा प्रामाणिकपणा काय असतो हे दाखवून देत असतात. आता अशीच एक घटना आळंदीतून समोर आली आहे. गंध लावून पैसे जमवणाऱ्या एका चिमुकलीला सोन्याचा मंगळसुत्र सापडलं होतं, पण तिने पोलिसांकडे जमा करत आपला प्रामाणिकपणा दाखवला आहे. (little girl return golden mangalsutra to police)
सोनं म्हटलं की अनेकांना लोभ सुटतो पण त्या मुलीने सोन्याचं मंगळसुत्र सापडूनही कोणता मोह न दाखवता तिने ते पोलिसांना दिले आहे. सापडलेलं मंगळसुत्र पोलिसांना देणाऱ्या या मुलीचे नाव पूजा भामरे असे आहे. ती मंदिराच्या परीसरात भक्तांना गंध लावण्याचे काम करते.
ती दररोज मंदिरात येते आणि परीसरात येणाऱ्या भाविकांना अष्टगंध लावण्याचे काम करते. त्यातून तिला १ रुपया, ५ रुपये मिळतात. काहीजण तर गंध लावून घेतात, पण पैसे देत नाही. असे असतानाही गरीबीत संघर्ष करणाऱ्या पूजाने हजारो रुपयांचं मंगळसुत्र पोलिसांना परत केलं आहे.
मंगळसुत्र परत केल्याच्या प्रामाणिकपणामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. अनेकांनी तिच्या प्रामाणिकपणाचं कौतूक केलं आहे. पोलिसांनीही तिच्या पाठीवर कौतूकाची थाप दिली आहे. तिच्या या कामाचे संपुर्ण परीसरात कौतूक केले जात आहे.
सध्या आळंदी पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांची गर्दी वाढली आहे. दररोज हजारो भाविक आळंदीत दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे अशा ठिकाणी चोरीचेही अनुभव येतात. त्यामुळे महिला आपले दागिने चोरी होऊ नये म्हणून रुमालात किंवा साडीच्या पदराला दागिने बांधून ठेवतात.
अशाच एका महिलेने ते मंगळसुत्र आपल्या रुमालात बांधून ठेवलं होतं आणि ते मंगळसुत्र पूजाला सापडलं. त्यानंतर तिने आपला प्रामाणिपणा दाखवत ते मंगळसुत्र आळंदी पोलिसांच्या हवाली केलं आहे. पूजासोबतच स्वरा आणि अथर्व हे देखील सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाविकांना अष्टगंध लावण्यासाठी परीसरात फिरत असतात.
महत्वाच्या बातम्या-
१०० व्या वाढदिवसानिमित्त मोदींची आईला खास भेट, ‘या’ रस्त्याला देणार आईचे नाव
35 % वाल्या लेकास बापाने दिला ‘असा’ धीर; वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही
“रडतोय काय लका, आपल्याला पुढं जाऊन जिंकायचं”, 35 % मिळालेल्या मुलाला बापाने दिला आधार