वाहतुकीचा एखादा नियम मोडल्यास त्याचा फटाका नागरिकांना बसतो. परंतु, दंड ठोठावल्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांना त्याचा फटका बसल्याची घटना बरेलीत घडली आहे. सध्या सगळीकडे बरेलीतील लाईनमनची चर्चा सुरू आहे. चेकपोस्टवर गाडीची कागदपत्रे नसल्याने पोलिस अधिकाऱ्याने स्वरूप भगवान ऊर्फ पिंकी याला ५०० रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यामुळे त्याने रागाच्या भरात असे काही केले की त्याचा पोलिस अधिकाऱ्याने कधीही विचार केला नसेल.
उत्तर प्रदेशमधील बरेली येथे ही घटना घडली आहे. चेकपोस्टवर पोलिस निरीक्षक मोदी सिंह यांनी एका लाईनमनला अडवून त्याच्याकडील दुचाकीचे कागदपत्रे मागितली. त्याच्याकडे कागदपत्रे नसल्याने त्याने त्यांना कागदपत्रे घरी जाऊन आणून दाखवतो असे सांगितले पण परंतु मोदी सिंह यांनी त्याच्याकडून ५०० रुपयांचा दंड आकारला. यानंतर त्या लाईनमनने टोकाचे पाऊल उचलले.
भगवान स्वरूप हे वीज विभागात लाईनमनचे काम करतात. त्यांनी वीज विभागातील इतर कामगारांना बोलावून चक्क पोलिस स्टेशनमधील बत्तीच गुल केली. पोलिस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यांनी वीज कनेक्शन सुरु केले नाही. वीज कनेक्शन बंद केल्यानंतर चिडलेले भगवान स्वरूप एवढ्यावरच थांबले नाहीत.
त्यांनी कनेक्शन बंद केल्यानंतर विजेची वायर स्वतःबरोबर घेऊन गेले. त्यामुळे पोलिस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांना रात्र अंधारातच काढावी लागली. या संपुर्ण प्रकरणानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिली. सिरौली पोलिस ठाण्याच्या परिसरातील हरदासपूर पोलिस स्टेशनमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. चक्क पोलिस कर्मचाऱ्यांना रात्रभर अंधारात राहावे लागल्याने या प्रकरणाची चांगलीच चर्चा होत आहे.
देशात सर्वत्र वाहतुकीचे नियम कडक केले आहेत. परंतु, दंड आकारल्यामुळे आपल्याला एवढी मोठी भुर्दंड सहन करावी लागेल याचा विचार ही पोलिसांनी स्वप्नात केला नसेल. लाईनमनच्या अजब कृतीमुळे उत्तर प्रदेशमध्ये या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
दरम्यान, या प्रकरणानंतर स्वरुप भगवान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हरदासपूर पोलिस चौकीत मीटरशिवाय वीज वापरली जात होती. त्यामुळे तेथील वीज पुरवठा खंडित करण्यात आला, असे स्वरुप भगवान यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर वीज विभागाचे मुख्य अभियंता संजय जैन यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरु आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर याप्रकरणी कारवाई केली जाईल, अशी माहिती जैन यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
राखी सावंतच्या आरोपांवर रितेशनं सोडलं मौन, म्हणाला, माझे पैसै उडवत होती अन्…
..त्यामुळे हॉट-सेक्सी दिशा पाटनीपासून मुलं काढायचे पळ, कोणीही म्हणत नव्हतं बोल्ड, वाचा किस्सा
अदानीला या मोठ्या प्रकल्पाचे काम मिळावे म्हणून मोदींनी श्रीलंकेच्या राष्ट्पतींवर आणला दबाव
“हिंदूंचा नायनाट करण्यासाठी पाकीस्तानने पुढाकार घ्यावा, मुस्लिम देशांनी एकत्र येत त्यांना पाठींबा द्यावा”