सोमवारी एलआयसीच्या आयपीओबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. एलआयसीचा आयपीओ सोमवारी मोठ्या घसरणीसह बंद झाला आहे. त्यामुळे एलआयसीचा आयपीओ गुंतवणूकदारांचे पैसे बुडवण्याच्या बाबतीत संपूर्ण आशियातील पहिल्या क्रमांकाचा आयपीओ बनला आहे. (lic IPo lost 1.78 lakhs crore)
स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाल्यापासून, एलआयसीचे बाजार मूल्य सुमारे १७ बिलियन डॉलर्सने कमी झाले आहे. यासह एलआयसीचा आयपीओ २०२२ मध्ये आशियातील सर्वात वाईट कामगिरी करणारा आयपीओ बनला आहे. एलआयसीचा शेअर आयपीओच्या किंमतीपेक्षा २९ टक्क्यांहून अधिक घसरला आहे.
ब्लूमबर्गने दिलेल्या आकडेवारीनुसार, एलआयसीचे मार्केट कॅप २९ टक्क्यांनी घसरले आहे. एलआयसीने आपल्या आयपीओची इश्यू किंमत ९४९ रुपये निश्चित केली होती. सोमवारी शेअर ६६८ रुपयांवर बंद झाला. म्हणजेच त्याच्या इश्यू किंमतीपेक्षा २८१ रुपये कमी.
शेअर बाजारात मोठी घसरण होत असताना एलआयसीचे शेअर्सही मोठ्या घसरणीसह बंद झाले आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी, लॉक-इन कालावधी संपताच, एलआयसीचा स्टॉक प्रथमच सुमारे ६ टक्क्यांनी घसरून ६६८.२५ रुपयांवर बंद झाला आहे.
एलआयसीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक केलेल्या अँकर गुंतवणूकदारांचा लॉक इन कालावधी संपला आहे. अँकर गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीमुळे मोठा तोटा सहन करावा लागला आहे. असे मानले जाते की अँकर गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे एलआयसीच्या शेअरमध्ये इतकी मोठी घसरण झाली आहे.
दरम्यान, एलआयसीचे मार्केट कॅप ४.२२ लाख कोटी रुपयांवर आले आहे. तर आयपीओ किंमतीनुसार एलआयसीचे बाजार भांडवल ६ लाख कोटी रुपये होते. म्हणजेच लिस्टिंग झाल्यापासून गुंतवणूकदारांचे १.७८ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
बाॅलीवूड पुन्हा काळजीत; ह्रदयविकाराच्या त्रासामुळे चालू शुटींगमधून दिपीका रूग्णालयात दाखल
तृप्ती देसाईंचा महिलांना सल्ला; वटपोर्णिमेला वडाच्या फांद्यांची पूजा करण्यापेक्षा..
..अन् सासूचे निधन झाले तरी मी १५ मिनीटं हसत होते, अर्चना पूरण सिंगच्या वक्तव्याने सगळेच झाले हैराण