गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडीतील काही आमदार नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र आघाडीत कोणतेही भेदभाव नसल्याच जेष्ठ नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचा सपाटा सुरु असल्याचं दिसत आहे.
यामध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते रडावर आहेत. तर दुसरीकडे केंद्रातील सरकार पदाचा दुरुपयोग करून त्रास देत असल्याचा आरोप शिवसेना करत आहे. त्यामुळे शिवसेना आणि केंद्रातील भाजपा सरकार यांच्यातील संघर्ष अधिक वाढला आहे.
तर दुसरीकडे राज्याचे पर्यटन मंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपविरोधात दंड थोपटले आहेत. राज्यात महाविकास आघाडीत कसलेही मतभेद नसून महाविकास आघाडीचा पॅटर्न देशातही पुढे राबविणार आहोत, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.
काल मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात आल्यावर ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी केलेल्या ‘पवार साहेब तुम्ही मुख्यमंत्री असता तर महाराष्ट्राचे चित्र वेगळे असते’, या वक्तव्याचे पडसाद राज्यातील राजकारणात उमटत आहे.
याबाबत पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांना विचारले. ‘त्या काय बोलल्यात हे मी ऐकलेले नाही,’ असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाष्य करण्यात टाळाटाळ केली. तसेच पुढे बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच भाजपाकडून होत असलेल्या नालेसफाईच्या दौऱ्याबाबत त्यांनी भाष्य केले.
दरम्यान, भाजपाकडून होत असलेल्या नालेसफाईच्या दौऱ्याबाबत ते म्हणाले, ‘काही वर्षे त्यांनी आमच्यासोबत एकत्र काम केले आहे. आता ते बाहेर फिरत आहेत, हे चांगलेच आहे. त्यामुळे निदान आम्ही केलेली कामे त्यांना दिसून येतील, असा खोचक टोला आदित्य यांनी लगावला.
महत्त्वाच्या बातम्या
रणबीर कपूरच्या प्रेमात वेड्या झाल्या होत्या ‘या’ टॉपच्या अभिनेत्र्या, पण प्रेमात मिळाला धोका
चित्रा वाघांनी मला बळजबरीने शिवसेना नेत्याविरोधात जबाब देण्यास भाग पाडले, डांबून ठेवले
सुजात आंबेडकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरुन मनसे आक्रमक; उपस्थित केला ‘हा’ संतप्त सवाल
बदलापुर! ज्या टीमने मागच्या वर्षी संघात घेतले नाही त्याच टीमवर तुटून पडला कुलदिप यादव, शिकवला धडा