किम शर्मा आणि प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेसच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. किम आणि लिएंडर पेस लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. तसेच जोडपे कोर्ट मॅरेज करण्याचा विचार करत आहे, असे म्हटले जात आहे. पण ते लग्न नक्की कधी करणार आहे, त्याबाबत अजून माहिती मिळालेली नाही. (lender paes married kim sharma)
सध्या बॉलिवूडमध्ये लग्न अनेक सेलिब्रिटी लग्न करताय. आलिया आणि रणबीरनंतर आता अथिया शेट्टी आणि केएल राहुल डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. अशा परिस्थितीत किम आणि लिएंडर देखील लवकरच लग्न करु शकतात असे म्हटले जात आहे.
किम शर्मा आणि लिएंडर पेस यांना त्यांच्या कुटुंबाने मान्यता दिली आहे. त्यामुळे हे जोडपे लवकरच लग्न करु शकते असे म्हटले जात आहे. दोघेही कोर्ट मॅरेज करु शकतात अशीही चर्चा आहे. पिंकव्हिलाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, लिएंडर आणि किमची फॅमिली मुंबईत भेटली होती. या भेटीत किम शर्माच्या वांद्रे येथील घरी कोर्ट मॅरेजवर चर्चा झाली आहे.
किम आणि लिएंडरचे घरचे भेटण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हे जोडपे कोलकाता येथे गेले होते. तिथे ते लिएंडरच्या पालकांना भेटले होते. नंतर किमचे आई-वडीलही त्यांना भेटले होते. किम आणि लिएंडरच्या लग्नाबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत.
किम शर्माने लिएंडरशी लग्न केले तर हे तिचे दुसरे लग्न असेल. तिने २०१० मध्ये एका बिझनेस मॅनशी लग्न होते. पण ते जास्त काळ टिकू शकले नाही. किमचे नाव युवराज सिंगसोबतही जोडले गेले. तर लिएंडर पेस संजय दत्तची पहिली पत्नी रिया पिल्लईसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होता. पण रियाने त्याच्यावर घरगुती हिंसाचाराच आरोप केल्यानंतर दोघेही एकमेकांपासून दूर झाले होते.
लिएंडर हा सध्या वयाच्या पन्नाशीत आहे. लिएंडर हा ४८ वर्षांचा आहे. तर किम शर्मा ही ४२ वर्षांची आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नाच्या चर्चा खऱ्या असतील तर लवकरच दोघेही लग्नाची तारीख जाहीर करतील. मार्च महिन्यातच या दोघांनी त्यांच्या नात्याची पहिली ऍनिव्हर्सरी सेलिब्रेट केली होती.
महत्वाच्या बातम्या-
“महागाईचा भोंगा वाजला, ५० रूपयांनी गॅस वाढला, अरे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?”
“एवढं नक्की सांगतो, पुढच्यावेळी आढळराव पाटील संसदेत असतील”; राऊतांनी कोल्हेंचे टेंशन वाढवले
पुण्यात मनसेची महाआरती, वसंत मोरेंची नाराजी दूर; शहराध्यक्षांचाही पोलिसांना इशारा