विधिमंडळ सचिवांकडून सर्व ५३ आमदारांना कारणे दाखवा नोटीस, पण आदित्य ठाकरेंना का वगळले?

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत भली मोठी फुट पडली आहे. एकेकाळी एकत्र असणारी शिवसेना आता मात्र दोन गट पडल्याने एकमेकांच्या विरोधात थेट न्यायालयात पोहचली आहे. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात शिंदे गट व शिवसेनेने एकमेकांविरोधात व्हीप काढले होते.

सोमवारी शिंदे यांच्यासह शिवसेनेतील 16 आमदारांच्या निलंबनाच्या नोटिसीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड आणि बहुमत चाचणीवेळी दोन्ही बाजूने बजावण्यात आलेले व्हीप डावल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, विधिमंडळ सचिवांनी एक मोठं पाऊल उचललं आहे.

सर्वोच्च न्यायालय सुनावणीच्या आधी विधिमंडळ सचिवांनी शिंदे गटासह शिवसेनेच्या 53 आमदारांना नोटीस बजावली आहे. विधिमंडळ सचिवांनी शिवसेनेच्या ५३ आमदारांना कारण दाखवा नोटीस बजावली आहे. दरम्यान यामध्ये उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरेंचा उल्लेख नाही.

शिंदे गटाने शिवसेनेतील 15 पैकी 14 आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे. विशेष म्हणजे त्यातून आदित्य ठाकरे यांचे नाव वगळण्यात आलं आहे.  विशेष बाब म्हणजे, बाळासाहेब  ठाकरेंबद्दलच्या आदरापोटी आदित्य ठाकरे यांचे नाव वगळून इतर १४ आमदारांना शिंदे गटाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.

शिवसेनेच्या सर्व आमदारांनी राहुल नार्वेकर यांना मतदान करावे तसेच बहुमत चाचणीवेळी सरकारच्या बाजूने मतदान करण्याचे सांगण्यात आले होते. मात्र विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत व्हीप झुगारून मतदान केल्याने आता शिंदे गटाकडून शिवसेनेच्या १४ आमदारांना आपात्रतेची नोटीस पाठण्यात आली होती.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांचे नाव वगळून शिंदे गटाकडून इतर १४ आमदारांना नोटीस पाठवण्यात आली होती. याबाबत बोलताना गोगावले यांनी म्हंटलं होतं की, आदित्य ठाकरे ते बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. आम्ही बाळासाहेबांचा आदर करतो. त्यामुळे आदित्य यांना नोटीस पाठवली नाही.

महत्त्वाच्या बातम्या
शिंदे गटाला समर्थन देणं तानाजी सावंतांना भोवलं, उद्धव ठाकरेंनी केली मोठी कारवाई
मला आपल्याशी बोलायचंय.., उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या एकमेव अपक्ष माजी मंत्र्याने दिले आमंत्रण
रामचरणच्या पत्नीने आई न होण्याचा निर्णय घेतल्यानंतर अध्यात्मिक गुरू म्हणाले, मानव ही लुप्त होणारी किंवा..
राज्यात भाजपच सरकार येताच भाजप आमदाराच्या घरासमोर सापडलं मोठं घबाड; प्रकरण वाचून हादरल