राज्यात नुकतीच राज्यभा निवडणूक पार पडली. निकाल देखील हाती आले. अत्यंत चुरशीच्या आणि उत्कंठावर्धक झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे तीन आणि भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले. मात्र या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला.
तर आता विधान परिषद निवडणुकीचा रनसंग्राम सुरू झाला आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्यासाठी १३ जूनची मुदत आहे. २० जून रोजी मतदान पार पडेल. सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान पार पडेल. २० जून रोजी सायंकाळी ५ नंतर मतमोजणी होईल. त्यावेळी विधान परिषदेचं चित्रं स्पष्ट होणार आहे.
त्यामुळे विधान परिषदेसाठीही खलबते सुरू आहेत. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाने यादी जाहीर केली आहे. पाच जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र भाजप नेत्या पंकजा मुंडेंना यामध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. यामध्ये प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना संधी देण्यात आली आहे.
तर अशातच राजकीय वर्तुळातून एक बातमी समोर येत आहे. सदाभाऊ खोत विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची माहिती सध्या हाती येत आहे. भाजपचं संख्याबळ पाहता अधिकृत पाच उमेदवार निवडून आणतानाच त्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
तर दुसरी गोष्ट म्हणजे, भाजपने जर सदाभाऊंना अपक्ष उमेदवारी देऊन त्यांना भाजपने पाठिंबा दिला तर त्यांच्यासाठी मत जुळवाजळवीसाठी आणखीनच तारेवरची कसरत असेल. त्यामुळे कोणतीही रिस्क न घेण्याच्या उद्देशाने सदाभाऊ खोत आपला अर्ज मागे घेणार असल्याच बोललं जातं आहे.
दरम्यान, आज याबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्णय घेणार असल्याच बोललं जातं आहे. तसेच मधल्या काळात सदाभाऊ खोत यांनी बरीच आंदोलनं केली. एसटी संपाच्या वेळीही त्यांनी आझाद मैदानावर जात संपाला पाठिबा दिला होता. यामुळे त्यांना विधान परिषदेसाठी भाजपकडून उमेदवारी मिळेल असं वाटलं होतं. मात्र भाजपने त्यांना संधी दिलेली नाहीये.






