महेश भट्ट नेहमी त्यांच्या वक्तव्यांमुळे आणि वादांमुळे चर्चेचा विषय ठरत असतात. काही दिवसांपुर्वी त्यांच्याच घरातील एका सदस्याने त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याचं कारण असं आहे की महेश भट्ट यांचे पुतणे सुमित सबरवाल यांची पत्नी लव्हिना लोध यांनी भट्ट कुटुंबावर गंभीर आरोप करीत एक व्हिडिओ जारी केला होता.
व्हिडिओमध्ये लव्हिनाने महेश भट्टवर अत्याचार आणि तिला धमकावल्याचा आरोप केला होता.महेश भट्ट यांचा पुतण्या आणि तिचा नवरा सुमित साबरवाल चित्रपटाच्या कलाकारांना ड्रग्ज आणि मुलींची पुरवठा करतात, असे ती म्हणाली होती. दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या वकिलाने व्हिडिओवर प्रतिक्रियाही दिली होती.
व्हीडिओच्या सुरूवातीलाच लव्हिनाने स्वत: ला महेश भट्टचा पुतण्या सुमित साबरवालची पत्नी असल्याचे वर्णन केले होते. लव्हिनाने असेही म्हटले आहे की बॉलिवूड कलाकारांना सुमित मुली आणि ड्रग्ज पुरवतो आणि महेश भट्ट यांना या गोष्टींची माहिती होती, असे आरोप तिने लावले होते.
तसेच महेश भट्ट हे चित्रपट उद्योगातील सर्वात मोठे डॉन असून त्यांनी अनेकांचे करियर पडद्याच्यामागे राहून बरबाद केले आहे. पुढे लव्हिना म्हणते, तुम्ही महेश भट्टचे म्हणणे ऐकले नाही तर ते तुमचे आयुष्य उध्वस्त करतात. महेश भट्टने बर्याच लोकांचे आयुष्य खराब केले आहे.
मी त्यांच्याविरुध्द तक्रार दाखल केल्यापासून, ते माझ्या घरात घुसून मला बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहे. एवढंच नाही तर पोलिसही मला मदत करत नाहीत. मी तक्रार नोंदवून ही कारवाई झाली नाही. लव्हिना पुढे म्हणाली, ‘मला किंवा माझ्या कुटूंबाला काही झाले तर याला महेश भट्ट, मुकेश भट्ट, सुमित साबरवाल, साहिल सहगल आणि कुमकुम सहगल जबाबदार असतील.
लव्हिनाच्या व्हिडिओनंतर खळबळ उडाली होती. तिने महेश भट्ट यांच्यावर अनेक गंभीर आरोप लावले होते. दरम्यान महेश भट्ट त्यांची मुलगी पुजा भट्ट हिच्यामुळेही चर्चेत आले होते. त्यांनी स्वताच्या मुलीलाच लिपलॉक किस केला होता त्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टिका झाली होती.
महत्वाच्या बातम्या
पुण्याचा ऋतुराज गायकवाड श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर; धक्कादायक कारण आले समोर
महेश भट्ट यांनी मुलगी पुजाबद्दल व्यक्त केली होती ‘ही’ लज्जास्पद इच्छा, लिपलाॅक किस देखील केला होता
एकदा पैसे गुंतवा आणि आयुष्यभर तुफान कमाई करा; जाणुन घ्या एलआयसीची नवीन योजना
शेतकऱ्याचा नाद नाय! एक गुंठ्याची शेती नेली ८ एकरावर, सालगडी म्हणून काम करणारा बनला करोडपती