प्रसिद्ध गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी निधन झाले. एक महिन्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातून त्या बऱ्या झाल्या होत्या. पण त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. आयसीयूमध्ये उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. (lata mangeshkar seat reserve in stadium)
लता मंगेशकर या क्रिकेटच्या मोठ्या चाहत्या होत्या. अनेकदा त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून क्रिकेट तसेच वेगवेगळ्या सामन्यांबाबत ट्विट केले जात होते. त्यांचे क्रिकेटवर किती प्रेम होते हे त्यांनी सुमारे ३९ वर्षांपूर्वीच दाखवून दिले होते. १९८३ मध्ये पहिल्यांदा विश्वचषक जिंकून भारतीय क्रिकेट संघ मायदेशी परतला होता, तेव्हा बीसीसीआयकडे खेळाडूंना देण्यासाठी पैसेही नव्हते, त्यामुळे लता मंगेशकर यांनी त्यांना मदत केली होती.
क्रिकेट चाहत्या लता मंगेशकर यांनी १९८३ मध्ये बीसीसीआयला मदत केली होती. आज जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआयकडे त्यावेळी इतका पैसा नव्हता. १९८३ मध्ये जेव्हा भारतीय संघ जगज्जेता झाला, तेव्हा बीसीसीआयकडे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला पगार देण्यासाठीही पैसे नव्हते.
बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एनकेपी साळवे यांना खेळाडूंना बक्षीस द्यायचे होते, पण पैशांअभावी त्यांनाही काही करता येत नव्हते. या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी साळवे यांनी लता मंगेशकर यांची मदत घेतली. लता दीदींनीही मदत करण्यास होकार दिला.
भारतीय संघाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर लता मंगेशकर यांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. ही मैफल सुपरहिट ठरली. या कार्यक्रमातून त्यांनी २० लाख रुपये कमावले आणि त्यांनी ती सर्व रक्कम भारतीय संघाला बक्षीस म्हणून भेट दिली.
१९८३ चा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघातील सर्व सदस्यांना प्रत्येकी १ लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. या कॉन्सर्टसाठी लता मंगेशकर यांनी बीसीसीआयकडून कोणतीही फी घेतली नव्हती. लता मंगेशकर यांचे हे योगदान बीसीसीआय आणि तत्कालीन खेळाडूंनी नेहमी लक्षात ठेवले.
तसेच बीसीसीआयने लता मंगेशकरांसाठी भारतातील प्रत्येक स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी दोन व्हीआयपी जागा कायमच्या राखून ठेवल्या जाईल, असा निर्णय घेतला होता. ७०-८० च्या दशकात लता मंगेशकर वानखेडे स्टेडियमवर मॅच बघण्यासाठी जायच्या. यावेळी लता मंगेशकर यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर हेही त्यांच्यासोबत मॅच बघायला यायचे.
महत्वाच्या बातम्या-
‘लतादीदींमुळे माझी बिर्याणी फेमस झाली, माझं अख्खं कुटुंब त्यावर जगलं’; वाचा भावूक करणारा किस्सा..
घर मालकीणीने अनैतिक संबंधाला विरोध केल्यामुळे, 30 वर्षीय तरुणाने महिलेची केली निर्घृण हत्या…
शाहरुखच्या समर्थनात उर्मिला मातोंडकर मैदानात, म्हणाली, आपण इतके बिघडलो आहोत की..