प्रसिद्ध गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी निधन झाले. एक महिन्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातून त्या बऱ्या झाल्या होत्या. पण त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. आयसीयूमध्ये उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. (lata mangeshkar promise to father)
लता मंगेशकरांना आशा, मीना, उषा आणि हृदयनाथ ही चार भावंडे होती. पं दीदानाथ मंगेशकर एका नाटकातील लतिका नावाच्या पात्राला प्रभावित झाले होते. त्यामुळे त्यांनी लता दीदींचे नाव हेमावरुन लता केले. वडिल दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक आणि नाट्यकलावंत होते. वडिलांमुळेच लतादीदींच्या मनात गायनाबद्दल आवड निर्माण झाली होती.
दीनानाथ मंगेशकरांच्या निधनानंतर १३ वर्षीय लता मंगेशकरांनी नोकरी करण्यास सुरुवात केली होती. कारण घरावर हलाखीची परिस्थिती आली होती. आपल्या मुलांनी आपल्या वडिलांसारखं बनावं म्हणून लता मंगेशकरांची आई दीनानाथ यांची नाटकं वाचून दाखवायची. तसेच त्यांच्या जीवणातील पैलू समजावून सांगायची.
ज्यावेळी दीनानाथ मंगेशकरांचे श्राद्ध होतं, तेव्हा मीना आणि आशा यांनी सर्वप्रकारचं भोजन बनवलं होतं. २१ प्रकारच्या भाज्या बनवल्या, पण त्यांच्या आईंना ते आवडलं नाही. त्यावेळी त्यांनी घरातील दीनानाथ मंगेशकरांच्या आवडीचं चांदीचं ताट विकलं.
त्यावेळी लता मंगेशकर खुप संतापल्या होत्या. तु बाबांच्या आवडीचं ताट का विकलंस? तेव्हा त्यांच्या आई म्हणाल्या, हे माझ्या मालकाचं श्राद्ध आहे. कोणत्या सोम्यागोम्याचं नाही. त्यामुळे ज्या थाटात ते राहिले, त्याच थाटामाटात त्यांच श्राद्ध व्हायला हवं. चांदीच्या एका ताटासाठी तु अश्रू का गाळतेय? तु मालकांसारखी गात राहिली, तर चांदीच्या काय सोन्याच्या नाण्यांचा तुझ्यावर वर्षाव होईल.
तसेच श्राद्धच्यावेळी पिंडदान करण्याची वेळ आली, तेव्हा सर्वजण कावळ्याची प्रतिक्षा करत राहिले. पण कावळा आला नाही. तेव्हा त्यांची आई म्हणाली, तुम्हा पाच भावंडांपैकी कोणीतरी काही चुक केली आहे, त्यामुळे कावळा पिंडाला शिवत नाहीये. त्यामुळे तुम्ही सर्वांनी मिळून काहीतरी प्रतिज्ञा करा म्हणजे कावळा पिंडाला शिवेल.
त्यावेळी सर्व भावंडांनी मिळून चार प्रतिज्ञा घेतल्या होत्या. पहिली प्रतिज्ञा रोज संगीताचा रियाज करु, दुसरी प्रतिज्ञा अशी केली की नेमानं बाबांचं श्राद्ध करु. तिसरी अशी प्रतिज्ञा केली की, तुमच्या श्राद्धदिनी दरवर्षी आम्ही संगीताचा कार्यक्रम सादर करु. पण तरीही कावळा आला नाही. तेव्हा संगीताशिवाय आम्ही दुसरं काहीही करणार नाही अशी चौथी प्रतिज्ञा त्यांनी घेतली होती आणि कावळा पिंडाला शिवला होता.
महत्वाच्या बातम्या-
‘हिंदी कलाकारांना जाऊ दिलं आणि आम्हाला अडवलं तेही मराठी पोलिसांनी’, हेमांनी कवीने सांगितला घटनाक्रम
Income tax शी निगडीत या 4 गोष्टींमुळे करदात्यांना होईल मोठा फायदा, मिळेल दिलासा
रात्री गाडी चालवताना चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी, नाहीतर होऊ शकतो तुमचा अपघात