Share

लतादीदींचा शेवटचा व्हिडीओ होतोय व्हायरल, त्यांची अवस्था पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा

lata mangeshakar

आपल्या गाण्यांनी सर्वांना वेड लावणाऱ्या लता मंगेशकर (lata mangeshkar) आता आपल्यात नाहीत. आवाजाने सर्वांची मने जिंकणाऱ्या लता मंगेशकर यांचा आवाज कायमचा नि:शब्द झाला आहे. रविवारी सकाळी लता मंगेशकर यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच हादरवून सोडले. रविवारी सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. (lata mangeshkar last video)

लता मंगेशकर यांच्यावर मुंबईच्या शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर सोशल मिडियावर अनेक फोटो, व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लतादीदी आजारी होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याच दरम्यान लता मंगेशकर यांचा शेवटचा व्हिडिओ समोर आला आहे.

https://twitter.com/i_am_nawal/status/1490363237623537665?s=20&t=75KyhtWNNPm9klAYYS60Kw

हा व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असताना हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘कशा आहात दीदी.. गुड,,?’ असं विचारपुस करताना डॉक्टर या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. मात्र तुम्ही पाहू शकता उपचारादरम्यान लता मंगेशकर यांची प्रकृती किती खालावली होती. सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून अनेकांच्या डोळ्यात पानी आलं आहे.

 

https://twitter.com/DivyeshTrivedi_/status/1490339432456622085?s=20&t=J-uYre8dBHJyjeXlDp-SAw

 

तसेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये लतादीदी कोणाचा तरी आधार घेऊन चालताना दिसत आहेत. दोन महिलांनी लता मंगेशकर यांना पकडलं असून त्या हळू चालत असल्याचंही व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान, कोरोनाची बाधा झाल्यामुळे लता मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानतंर त्यांची प्रकृती गंभीर होत गेली आणि अखेर ६ फेब्रुवारी रोजी वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे.

दरम्यान, लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी अनेक मान्यवर शिवाजी पार्क येथे दाखल झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दीदींच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, अन्य मान्यवरांनी दर्शन घेतले.

याचबरोबर लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अक्षय कुमारपासून ते भूमी पेडणेकर, निमृत कौर, विशाल ददलानी, दिया मिर्झा आणि हंसल मेहतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी लताजींना श्रद्धांजली वाहिली आहे.  शिवाजी पार्क येथे लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. लताजींच्या निधनामुळे दोन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
आदित्य ठाकरेंचा मोदींशी डोळ्यात डोळे घालून संवाद, राज्यपाल कोश्यारींची नजर मात्र खाली
बाप-लेकीच्या नात्यातील जिव्हाळाचं दर्शन! लतादीदींच्या अंत्यदर्शनावेळीचा ‘तो’ फोटो होतोय तूफान व्हायरल
बाप की राक्षस! पोटच्या मुलीवर अनेकदा केला बलात्कार, असा झाला खुलासा
14 कोटी फॉलोअर्स असणाऱ्या लता मंगेशकर केवळ ‘या’ नऊ जणांना करत होत्या फॉलो

इतर ताज्या बातम्या तुमची गोष्ट बाॅलीवुड राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now