प्रसिद्ध गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले आहे. २८ दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. (lata mangeshkar death reason )
लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर आज शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार होणार आहेत. लता मंगेशकर यांचे पार्थिव आज दुपारी १२ ते ३ या वेळेत त्यांच्या पेडर रोड येथील प्रभु कुंज येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. यानंतर दुपारी ४.३० वाजता त्यांना शिवाजी पार्कवर आणण्यात येणार आहे.
पंतप्रधान मोदी त्यांच्या शेवटच्या भेटीसाठी मुंबईत पोहोचणार आहेत. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ६.३० वाजता शिवाजी पार्कवर पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या घटनेमुळे संपुर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी हैराण करणारी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, लता दीदींना कोरोना आणि न्यूमोनिया झाला होता. मात्र, मध्यांतरी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली आणि त्यांना व्हेंटिलेटरवरूनही काढण्यात आले होते. मात्र शनिवारी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले.
लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणाऱ्या ब्रीच कँडी हॉस्पिटलचे डॉ. प्रतित समदानी यांनी सांगितले की, रविवारी, ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.१२ वाजता लताजींचे निधन झाले. त्यांनी सांगितले की, लता मंगेशकर यांना न्यूमोनिया आणि कोरोना झाल्यानंतर त्यांचे अनेक अवयव निकामी झाले होते. त्यांच्या शरीरातील अनेक अवयव काम करणे बंद झाले होते, त्यामुळे त्यांचे निधन झाले आहे.
लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अक्षय कुमारपासून ते भूमी पेडणेकर, निमृत कौर, विशाल ददलानी, दिया मिर्झा आणि हंसल मेहतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी लताजींना श्रद्धांजली वाहिली आहे. शिवाजी पार्क येथे लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. लताजींच्या निधनामुळे दोन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
कहाणी गाणकोकीळेची: या कारणामुळे नाही केले लग्न, ५० वेळा पाहिला होता एकच चित्रपट
…म्हणून लता मंगेशकर यांनी आयुष्यभर लग्न केले नाही; जाणून घ्या खरे कारण..
लतादीदींच्या निधनानंतर बाॅलिवूड शोकसागरात; अनिल कपूर म्हणाले काळीज तुटलं..






