प्रसिद्ध गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी निधन झाले. एक महिन्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातून त्या बऱ्या झाल्या होत्या. पण त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. आयसीयूमध्ये उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. (lata mageshkar first english song)
लता मंगेशकरांच्या निधनानंतर संपुर्ण देशभरात शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर लता मंगेशकरांची गाणी, वेगवेगळ्या आठवणी शेअर केल्या जात आहे. लता मंगेशकरांचे जुने फोटो, आठवणी, त्यांची अनेक हिट गाणी कलाकार आपल्या अकाऊंटवरुन शेअर करत आहे.
अनेक पिढ्यांना आपल्या गोड आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या लता मंगेशकर यांनी केवळ भारतीयांनाच नव्हे, तर जगातल्या अनेक देशांमध्ये त्यांनी आपल्या आवाजाने लोकांना वेड लावले होते. त्यामुळे भारतातच नाही, तर जगभरात त्यांचे चाहते आहे. त्यामुळे परदेशतल्या संगीतकारांनाही लतादीदींनी आपले गाणे गावे अशी इच्छा होती.
लता मंगेशकरांनी जवळपास ३६ भाषांमध्ये ५० हजारांहून अधिक गाणी गायली आहे. तसेच त्यांनी इंग्लिशमध्येही गाणी गायली आहे. आता शास्त्रीय गायक महेश काळे यांनी लता मंगेशकरांच्या एका गाण्याची गोष्टी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटला शेअर केली आहे.
महेश काळे यांनी लता मंगेशकरांचा लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, १९८५ मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात लता मंगेशकरांनी इंग्लिश गाणे गायल्याचे सांगितले आहे. गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या मुलांच्या मदतीसाठी तो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, असे महेश काळे यांनी म्हटले आहे.
यावेळी लता मंगेशकरांनी कॅनडातील गायिका एनी मरे हिचं यु नीडेड मी हे गाणं गायलं होतं. त्यांच्या मधूर आवाजामध्ये हे गाणं ऐकून इंग्लिश भाषा असलेले श्रोतेही मंत्रमुग्ध झाले होते. लता मंगेशकर यांनी इंग्रजी भाषेतलं गाणं गाण्याची ती पहिलीच वेळ होती.
लता मंगेशकरांनी जेव्हा तिथे हे गाणं गायलं, तेव्हा त्यांचे वय ५५ वर्षे होते. त्या कारकिर्दीच्या उच्च शिखरावर पोहोचलेल्या होत्या. तरीही त्यांच्यात नवीन गोष्टी शिकण्याची, नवीन प्रयोग करण्याची उर्मी होती. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांच्या पाठीवर कुटुंबाची जबाबदारी आली होती. त्यामुळे गाणं असो वा अभिनय त्या पुर्ण निष्ठेने मेहनत घेऊन आपले काम करायच्या.
महत्वाच्या बातम्या-
महिंद्रा थार खरेदी करण्याची सुवर्णसंधी, फक्त ६९१ रुपयांत घरात आणा नवी कोरी कार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण तापलं, आयुक्तांच्या अंगावर फेकली शाई
कर्नाटक हिजाब प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रात; मुंबई, मालेगावात मुस्लिम तरुण-तरुणी रस्त्यावर