आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी सध्या बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहेत. १४ जुलै रोजी मोदींनी सुष्मितासोबतचे नाते अधिकृत केले. तेव्हापासून ललित मोदींना खूप ट्रोल केले जात आहे, मात्र रविवारी त्यांनी इंस्टाग्राम पोस्टद्वारे ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले. (lalit modi angry on trollers)
ते म्हणाले की, जेव्हा मी BCCI जॉईन केले, तेव्हा त्यांच्याकडे ४० कोटी होते आणि नंतर मला बॅन केले गेले, तेव्हा BCCI कडे ४७ हजार कोटी होते, असे म्हणत ललित मोदी यांनी ट्रोलर्स सुनावले आहे. तसेच या वयात डेट करणे काही चुकीचे नाहीये, असेही ललित मोदी यांनी म्हटले आहे.
ललित मोदी यांची पोस्ट-
सोशल मीडियाला ट्रोल करण्याचं एवढं वेड का आहे? मी पाहिलं की मला चुकीच्या मार्गांनी टॅग केले जात आहे. मला कोणी समजावून सांगेल का? मला वाटते की मी अजूनही मध्यम वयात जगत आहे. या वयात दोन व्यक्ती डेट करुच शकतात.
‘माझा सल्ला आहे, जगा आणि इतरांना जगू द्या. तुम्ही लोकं फेक न्यूज करू नका. योग्य बातमी लिहा आणि जर तुम्हाला माहित नसेल तर मला तुमच्या आयुष्यातील सर्व प्रेमप्रकरण उघडे करू द्या. मीनल मोदी १२ वर्षे माझी चांगली मैत्रिण होती, या काळात तिचे लग्नही झाले. ती माझ्या आईची मैत्रिण नव्हती. या सर्व अफवा आहेत.
या छोट्या विचारातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. आशा आहे की तुम्हाला याचा अर्थ काय आहे हे माहित असेल. मी तुमच्यापेक्षा बराच हुशार आहे. तुम्ही मला ‘फरार’ म्हणता, मग तुम्ही मला सांगा की कोर्टाने मला कधी दोषी ठरवले आहे. माझ्यासारखे काम करून देशाचे नाव उंचावणाऱ्या या देशातील एकाही व्यक्तीचे नाव सांगा.
भारतातील १२-१५ शहरांमध्ये व्यवसाय करणे किती कठीण आहे हे सर्वांनाच माहीत आहे. हे सर्व मी एकट्याने केले हे सर्वांना माहीत आहे. बीसीसीआयमध्ये कोणीही काही केले नाही. हे सर्वजण ५०० डॉलर आणि टीए-डीए घेण्यासाठी आले होते. अजून कोण माहीत आहे का? ज्याने माझ्यासारखी आयपीएल बनवली आणि देशाला एकजूट करून त्याचा आनंद लुटण्यास मदत केली.
तुम्ही मला फरार म्हणाल आणि मी त्याचा विचार करत बसेन? नाही. मी कधीही लाच घेतली नाही आणि मला त्याची गरजही पडली नाही. मी राय बहादूर गुजरमल मोदी यांचा पणतू आहे हे कदाचित तुम्ही विसरलात. मी जन्मानेच श्रीमंत आहे. जनतेचा पैसा घेतला नाही. मी कधीच सरकारकडे काही मागितले नाही.
२९ नोव्हेंबर २००५ रोजी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी बीसीसीआयमध्ये कामाला सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्या बँक खात्यात ४० कोटी रुपये होते. जेव्हा माझ्यावर बंदी घातली गेली तेव्हा त्याच्या खात्यात १७ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ४७ हजार ६८० कोटी रुपये होते. लाज वाटली पाहिजे खोट्या मीडियाला. तुम्ही मला हिरोसारखे बघितले पाहिजे, थोडे प्रामाणिकपणे काम करा.
महत्वाच्या बातम्या-
अमोल मिटकरींनी मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार; म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी…
कचऱ्याच्या गाडीत सापडले पंतप्रधान मोदी आणि योगींचे फोटो, सफाई कर्मचाऱ्याने गमावली नोकरी
नगरच्या पठ्ठ्याच्या ‘या’ जुगाडावर आनंद महिंद्रा सुद्धा झाले फिदा; फोल्डिंग जिना पाहून म्हणाले…