Share

आपल्याच आईच्या मैत्रिणीशी ललित मोदींनी केले होते लग्न, लव्हस्टोरी वाचून सुष्मिताला जाल विसरुन

प्रसिद्ध उद्योगपती ललित मोदी बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनला डेट करत आहेत. ललित मोदींनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन ही माहिती दिली आहे. २००८ मध्ये त्यांनीच आयपीएलची सुरुवात केली होती. पण २०१० मध्ये त्यांना घोटाळ्याच्या आरोपावरून पदावरून हटवण्यात आले होते. (lalit modi and meenal modi love story )

त्यानंतर ललित मोदी हे देश सोडून त्यांच्या भावाकडे निघून गेले होते. सध्या ते सुष्मिता सेनला डेट करत असल्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहे. पण ललित मोदी यांनी याआधीही एक विवाह केला होता. आज आपण त्यांच्या त्याच लव्ह स्टोरीबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव मीनल असे होते.

मीनल ही ललित मोदींच्या आईची मैत्रीण होती. परदेशात असताना दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. ललित मोदी आणि त्यांची माजी पत्नी मीनल यांच्या वयात ९ वर्षांचा फरक होता. ललित मोदींनी मीनलसमोर आपलं प्रेम व्यक्त केलं तेव्हा तिला राग आला. तिने नायजेरियन उद्योगपती जॅक सागरानीसोबत लग्न केले. त्यानंतर दोघांचे बोलणे बंद झाले.

मीनल यांचे लग्न जास्त काळ टीकले नाही आणि त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर मीनल आणि ललित दोघे पुन्हा एकदा जवळ आले, पण त्यांच्या कुटुंबीयांना ते मान्य नव्हते. पण अनेक प्रयत्नानंतर त्यांनी कुटुंबाचा होकार मिळवला. त्यानंतर ललित मोदी आणि मीनल मोदी यांनी लग्न १७ ऑक्टोबर १९९१ ला लग्न झाले.

ललित मोदींनी त्यांची एक सावत्र मुलगी दत्तक घेतली, तिचे नाव करीम आहे. ललित मोदी आणि मीनल मोदी यांनाही दोन मुले आहेत. मुलगा रुचिर मोदी आणि मुलगी आलिया मोदी. मीनल मोदी यांचे २०१८ मध्ये निधन झाले. ललित मोदी यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट करून ही माहिती दिली होती, मात्र त्यांनी मृत्यूचे कारण सांगितले नाही.

ललित मोदींना लंडनमधून परत आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे, पण त्यात यश आले नाही. त्यांच्यावर मनी लाँड्रिंगसह अनेक आरोप आहेत. तसेच त्यांनी मॉरिशसच्या एका कंपनीला आयपीएलचे ४२५ कोटींचे कॉन्ट्रॅक्ट दिले होते. त्यामध्ये कमिशन म्हणून १२५ कोटी घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

महत्वाच्या बातम्या-
…अन् पंतप्रधान मोदींनी मला मुख्यमंत्री करुन सगळ्यांची तोंड बंद केली; शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
ललित आणि सुष्मिताच्या नात्यावर एक्स बॉयफ्रेंडची धक्कादायक प्रतिक्रिया; म्हणाला, मनसोक्त हसून घ्या, कारण…
काजोलने बॉलिवूडचे ‘ते’ काळे सत्य केले उघड; म्हणाली, २८ इंच कंबर आणि ३६ इंच छाती…

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now