‘लागिर झालं जी’ फेम अभिनेत्री शिवानी बावकरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडयावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये शिवानी बॉलिवूड गायिका ध्वनी भानुशालीच्या एका ट्रेडिंग गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहे. शिवानीचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांच्या फारच पसंतीस उतरत आहे.
शिवानीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये दिसत आहे की, शिवानी व्हाईट कलरच्या वेस्टर्न आऊटफिटमध्ये फारच ग्लॅमरस दिसत आहे. व्हिडिओत ती सध्या ट्रेंडिंग असलेल्या ‘खो गयी मैं’ या गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहे. शिवानीचे या गाण्यावर जबरदस्त डान्स मूव्हस या व्हिडिओत पाहायला मिळत आहेत.
शिवानीचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांच्या फारच पसंतीस उतरत आहे. आतापर्यंत तिचा हा व्हिडिओ दीड लाखापेक्षा अधिक वेळा पाहण्यात आला आहे. तर व्हिडिओला २७ हजारपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच व्हिडिओतील शिवानीचे डान्स मूव्ह्स पाहून चाहते कमेंटद्वारे तिचे भरभरून कौतुक करत आहेत.
शिवानी बावकर पुण्यात एका आयटी कंपनीत जर्मन लँग्वेज एक्सपर्ट म्हणून काम करत होती. पण नंतर ती अभिनय क्षेत्राकडे वळाली. झी मराठी वाहिनीवरील ‘लागिरं झालं जी’ या मालिकेतील शितली या भूमिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
मालिकेतील खोडकर पण तितकीच निरागस शितली प्रत्येकालाच आवडली होती. तसेच मालिकेतील अज्या आणि शीतलीच्या जोडीला प्रेक्षकांची खूप पसंती दिली होती. आता ही मालिका संपली असली तरी अज्या आणि शीतलीच्या जोडी प्रेक्षकांच्या कायम स्मरणात आहे.
‘युथफुल’ या सिनेमाद्वारे शिवानी बावकरने चित्रपट सृष्टीतही पदार्पण केले. याशिवाय ती ‘मन मंदिरा- गजर भक्तीचा’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतानाही दिसून आली. सध्या शिवानी सोनी मराठी वाहिनीवरील कुसुम या मालिकेत काम करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
मोदींच्या सुरक्षेतील ढिसाळपणावर बाॅलीवूड कलाकार संतापले; म्हणाले, लाज वाटली पाहीजे…
कुणाला कामराने दिला मोदींना पाकिस्तानात जाण्याचा सल्ला; काय आहे नेमके प्रकरण…
“सदावर्ते एसटी कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावताय, ते आंदोलनाच्या नावावर वर्गणी गोळा करताय”