राज्यात मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड केली जाते. पण हा ऊस तोडण्यासाठी जे कामगार येतात त्यांच्याबद्दल कोणीच विचार करत नाही. ऊसतोड कामगार म्हणलं की, आपल्या समोर फक्त कारखाना आणि ऊसाचा फड पण ते कसं जीवन जगतात हे जर तुम्हाला कळलं तर तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
आतापर्यंत ऊसतोड कामगारांच्या अनेक समस्या तुम्हाला ऐकायला मिळाल्या असतील. या ऊसतोड कामगारांना ऊस तोडण्यापासून वेळच मिळत नाही. पण सध्या एक रील व्हायरल होत आहे ज्यामुळे ऊसतोड कामगारांमधलं एक कुटुंब खुप व्हायरल झालं आहे.
लोकांनी त्यांना भरभरून प्रेम दिलं आहे. ऊस तोडणीतून वेळ मिळाल्यानंतर हे कुटुंब रील्स बनवतं. ऊस तोडणारं हे कुटुंब अचानक सोशल मिडीयावर प्रसिद्ध झालं आहे. त्याला कारणही तसंच आहे. अशोक हजारे आणि त्यांच्या पत्नी मनिषा हजारे यांना नवा छंद जडला आहे.
ते आता ऊस तोडणीतून वेळ काढून इन्टाग्रामवर रील्स बनवतात. आपल्या दैनंदिन आयुष्याचे व्हिडीओ ते सोशल मिडीयावर शेअर करत असतात. पण त्यांच्या सगळ्यात जास्त व्हिडीओ पाहिला गेला तो बैलगाडीत ऊस घेऊन जातानाचा व्हिडीओ.
या एका व्हिडीओमुळे हे दाम्पत्य रातोरात स्टार झालं आहे. सोशल मिडीयावर या व्हिडीओने धुमाकूळ घातला. या व्हिडीओला लाखोंच्या घरात व्ह्युज गेले आहेत. हे दोघेही बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील सोमनाथ गावचे रहिवासी आहेत.
सध्या हे दाम्पत्य ऊस तोडणीसाठी कर्नाटकात असलेल्या बाळासाहेब शिवशक्ती साखर कारखान्यात ऊस तोडणीचं काम करत आहे. ऊस तोडणीच्या कामातून वेळ मिळाल्यानंतर हे दाम्पत्य इन्स्टाग्रामवर रील्स बनवतं. त्यांनी हे व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर करण्यास सुरूवात केली.
बैलगाडीतून ऊस घेऊन जातानाचा हजारे दाम्पत्याच्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि ते स्टार झाले. हा व्हिडीओ त्यांनी आयुष्याच्या प्रत्येक क्षणात आनंद शोधता आला पाहिजे. ज्याला ही कला जमली, त्याला आयुष्यातला आनंद समजला. त्याला आयुष्य समजलं अशा आशयासह शेअर केला. त्यानंतर या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसच पडला.
https://www.instagram.com/reel/CnjUI_CBxGc/?igshid=YmMyMTA2M2Y=
महत्वाच्या बातम्या
तलाव खोदताना सापडली भगवान विष्णूची अप्रतिम मूर्ती, दर्शनासाठी तुफान गर्दी; पहा मुर्तीचे photo
सासू सासऱ्यांनी सुनेसाठी उचलले अनोखे पाऊल, मुलाच्या मृत्यूनंतर दिराशी लावून दिले लग्न
मोठी बातमी! महाविकास आघाडीत पडली उभी फुट, राष्ट्रवादीने घेतला स्वबळावर लढण्याचा निर्णय
‘मैं अब्बा का सपना पूरा कर रहा हूं’, नंबर १ बनताच सिराज भावूक, वडीलांच्या आठवणीत अश्रू अनावर