Share

आपलं नातं सगळ्याच्या पल्याड आहे, तू माझी.., कुशल बद्रिकेने मेव्हणीसाठी केली खास पोस्ट

चला हवा येऊ द्या हा शो आज घराघरात पोहोचला आहे. या शोमधील प्रत्येक पात्राने लोकांच्या मनात घर केले आहे. त्यातीलच एक कलाकार म्हणजे कुशल बद्रिके. कुशल बद्रिके चला हवा येऊ द्या शोचा हुकूमी एक्का आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कुशल बद्रिके सोशल मिडीयावर नेहमी खुप ऍक्टिव्ह असतो.

अनेकदा तो त्याच्या येणाऱ्या नाटकांची, चित्रपटांची किंवा गाण्यांची माहिती सोशल मिडीयावरून देत असतो. नुकतंच कुशल बद्रिकेने त्याच्या मेव्हणीसाठी खास पोस्ट केली जी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ही पोस्ट त्याने त्याची पत्नी सुनयनासाठी शेअर केली आहे.

यात त्याने त्याच्या पत्नीच्या बहिणीचे खास वर्णन करताना तिचे कौतुक केले आहे. त्याची ही पोस्ट सध्या खुप व्हायरल होत आहे. कुशल बद्रिकेच्या पत्नीचे नाव हे सुनयना असे आहे तर पत्नीच्या बहिणीचे नाव स्वप्ना असे आहे. नुकतंच कुशल बद्रिकेच्या मेहुणीचा वाढदिवस पार पडला.

या वाढदिवसानिमित्ताने त्याने आपल्या मेहुणीसाठी एक खास पोस्ट शेअर केली होती. कुशलने ही पोस्ट इन्स्टाग्रामवर केली होती ज्यात त्याने लिहीले होते की, कधीकधी एकाच नात्यात असंख्य नाती दडलेली असतात, बघना कधीकधी मुलांची काळजी घेता घेता तू माझी सुद्धा “आई” होतेस, कधी तुझ्या बहिणी सोबत माझी सुद्धा “बहिण” होतेस, कधी मला, तू माझी “मुलगी” असल्यासारखी तुझी काळजीच वाटू लागते, “नात्याच्या प्रत्येक पदराला वेगळी भावना जोडलेली असते” नाहीका ?

छे आपलं नातं या सगळ्याच्या पल्याड आहे तू “मैत्रीण” आहेस माझी yes a perfect phrase for various relations. माझ्या जगातल्या सगळ्यात सुंदर आणि Brave मैत्रिणे तुला happy birthday. असं कुशलने त्याच्या पोस्टमध्ये लिहीलं आहे. कुशलने शेअर केलेली ही पोस्ट सध्या खुपच व्हायरल होत आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वीच कुशल बद्रिके पांडू या चित्रपटात झळकला होता. यामध्ये त्याने भाऊ कदमसोबत प्रेक्षकांचे खुप मनोरंजन केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा कुशल बद्रिके आपल्याला जत्रा २ या चित्रपटात धमाल करताना दिसणार आहे. जत्रा २ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

महत्वाच्या बातम्या
Xiaomi च्या दमदार 4K smart TV वर मिळतोय ‘एवढ्या’ हजारांचा डिस्काऊंट, आताच खरेदी करा नाहीतर..
फडणवीस-आठवलेंसमोरच भाजप खासदाराने केले गंभीर आरोप, म्हणाला, मी दलित असल्यामुळेच..
बेबी एबीमध्ये दिसली खऱ्या एबीची झलक, मारला सगळ्यात लांब षटकार, पहा जबरदस्त व्हिडीओ
राष्ट्रवादी विरूद्ध भाजप वाद पेटला, फडणवीसांनी सलग १४ ट्विट करत शरद पवारांवर केले गंभीर आरोप, म्हणाले..

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now