Share

शिवरायांची समाधी टिळकांनी बांधली नाही; पणतू कुणाल टिळकांच्या खुलाश्याने राज ठाकरे तोंडावर आपटले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल औरंगाबादमध्ये सभा घेतली. त्यानंतर राजकारण तापलेले आहे. या सभेची गेल्या 10 दिवसांपासून चर्चा सुरू होती. अखेर सभेला परवानगी मिळाली आणि सभा पार पडली. या सभेनंतर अनेक नेत्यांनी राज ठाकरेंवर टिका केली आहे.

या सभेकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधल्याचं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यानंतर राजकारण तापलं आहे. अनेक नेत्यांनी राज ठाकरेंचा हा दावा खोडून काढला आहे. पण आता स्वता लोकमान्य टिळकांचे पणतू कुणाल टिळक यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

त्यांनी टिळकांवर सुरू असलेले राजकारण थांबवण्याची विनंती केली आहे. ते म्हणाले की, सोशल मिडीयावर जी काही टिळकांची बदनामी सुरू आहे ती कृपया करून थांबवा. टिळकांना राजकारणात ओढलं जातंय. कोणत्याही पुराव्याशिवाय लोक काहीही बोलत आहेत.

शिवरायांची समाधी बांधल्याचा टिळक कुटुंबीयांचा दावा नाही, असं ते म्हणाले. टिळकांनी नाही तर फुलेंनी शिवरायांची समाधी बांधली असा काही इतिहासकारांचा दावा होता आणि राज ठाकरेंच्या दाव्यामुळे राजकारण तापलं होतं. पुढे कुणाल टिळक म्हणाले की, काहींकडून ब्राम्हणद्वेष पुढं आणण्याचं काम होत आहे.

टिळकांनी जो काही फंड जमा केला होता तो डेक्कन बँकेत जमा केला होता. त्याचे पुरावे केसरीमध्ये १८९९ च्या वर्तमानपत्रात आहेत. टिळकांनी याचे पुरावे केसरीमध्ये छापले होते. त्यानंतर डेक्कन बॅंक दिवाळखोरीत गेली. समाधीसाठी टिळकांनी २० हजारांचा निधी जमा केला होता, असंही ते म्हणाले.

पुढे त्यांनी महाराष्ट्राला आवाहन केलं की, सोशल मिडीयावर ब्राम्हण समाजाचा अपमान होत आहे. माझी एवढीच विनंती आहे की आपण पुर्ण अभ्यास करून मतं मांडली पाहिजेत. मला सकाळपासून ब्राम्हण लोकांचे फोन येत आहेत की आपण यावर काहीतरी केलं पाहिजे. ब्राम्हण समाजाचा अपमान नाही व्हायला पाहिजे त्यामुळं हे सगळं थांबवावं असं आवाहन त्यांनी लोकांना केलं आहे.

महत्वाच्या बातम्या
शरीर संबंध ठेवण्याआधीच ग्राहकांचा घ्यायची जीव; ‘या’ महिला सेक्स वर्करची कहानी ऐकून हादरुन जाल
इंग्लंडमध्ये सापडलेली ‘ती’ कवटी आहे ब्रिटीशांच्या क्रुरतेची साक्षीदार, १८५७ ची भयानक घटना ऐकून हादरुन जाल
टिळकांनी समाधी बांधण्यासाठी पैसे गोळा केले पण समाधी बांधली नाही; आव्हाडांचा पुराव्यानिशी गंभीर आरोप
राजकारणातील सर्वात मोठी बातमी! राज ठाकरेंना अटक होणार? पहा नेमकं काय घडलयंं

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now