पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी पंजाबच्या दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर ते जाहीर सभाही घेणार होते. परंतु त्या मार्गावर शेतकरी आंदोलकांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं करायला सुरुवात केली. त्यामुळे पंतप्रधान पंजाब दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतले. यावरून, काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलेच आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. त्यातच आता प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने देखील उडी मारत, मोदींवर निशाना साधला आहे.
मोदींना त्यांचा दौरा रद्द करावा लागल्याने भाजपकडून काँग्रेसवर आणि पंजाबच्या सरकारवर निशाणा साधला गेला. मोदींच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न पंजाबकडून करण्यात आला, असा आरोप भाजपने केला आहे. पंजाबमधील काँग्रेस सरकारने जाणीवपूर्वक मोदींच्या सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी ठेवल्याचा आरोपही भाजपकडून करण्यात आला. मात्र, काँग्रेसने मोदींच्या सभेला गर्दी नसल्याने त्यांनी दौरा रद्द केला आणि परत गेले असे म्हटले.
आता यावर, स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने भाजपवर निशाणा साधला आहे. कुणालने, ‘जर कोणाला भारतात असुरक्षित वाटत असेल तर त्यांनी पाकिस्तानात जावे – हा बॉलिवूड अभिनेता आणि त्याची पत्नी’ असे म्हणत मोदींवर टोला लगावला आहे. कामराचे हे ट्विट प्रचंड व्हायरल झाले आहे. तसेच त्याने म्हटले की, सुरक्षेच्या कारणास्तव तुमचा शो रद्द झाला हे आश्चर्यजनक आहे. माझ्या बाबतीत असा प्रकार कधीच घडला नाही.
https://twitter.com/kunalkamra88/status/1478771984733544455?t=mxsQ4c_PcwRMGOf8eQD3mA&s=19
कुणाल कामरा हा एक प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन आहे. तो अनेकवेळा त्याच्या कॉमेडीच्या माध्यामातून भाजप आणि मोदींवर टीका करताना दिसतो. त्याचबरोबर सोशल मीडियावरही तो मोदींच्या विरोधात पोस्त करताना दिसतो. त्याने मोदींविरोधात अनेक मीमही फेसबुक तसेच ट्विटरवर शेअर केले आहेत. सध्या कुणालच्या या ट्विट वरून नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
तसेच, मोदींवर पंजाबमध्ये झालेल्या या प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील आपली प्रतिक्रिया देत काँग्रेसवर निशाणा साधला होता. काँग्रेसशासित प्रदेश पंजाबमध्ये घडलेल्या आजच्या घटनेवरुन हा पक्ष कसा विचार करतो आणि कार्यकरतो हे सर्वांच्या लक्षात आले असेल. जनतेने त्यांना वारंवार नाकारल्यामुळे ते वेडेपणाच्या मार्गावर गेले आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांनी आपल्या या कृत्याबद्दल भारतातील जनतेची माफी मागावी, असे ट्विट अमित शहा यांनी केले होते.
If someone feels unsafe in India they should go to PAKISTAN – This Bollywood actor & his wife.
— Kunal Kamra (@kunalkamra88) January 5, 2022
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अरमिंदर सिंग यांनीही मोदींच्या सुरक्षेच्या गैरसोयीबद्दल संताप व्यक्त केला होता. त्यांनी मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी आणि गृहमंत्री सुखजिंदरसिंग रंधवा यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पाकिस्तानच्या सीमारेषेपासून केवळ १० किमी अंतरावरील मार्गावर आपण पंतप्रधानांसाठी सुरक्षित मार्ग देऊ शकत नाहीत. मग,आपणास पदावर राहण्याचा अधिकार नाही, असे अरमिंदरसिंग यांनी म्हंटले होते.
महत्वाच्या बातम्या
पेन्शनधारकांना मोदी सरकारचे मोठे गिफ्ट! तब्बल ९ पटीने वाढणार पेन्शनची रक्कम
‘या’ स्टार खेळाडूच्या फलंदाजीवर संतापले गावस्कर; म्हणाले, संघाची जबाबदारी असताना असं खेळणं मुर्खपणा
घरवाली बाहरवाली! एकाच शहरात दोन पत्नींसोबत राहत होता तरूण, असा झाला भांडाफोड






