Homeइतरपेन्शनधारकांना मोदी सरकारचे मोठे गिफ्ट! तब्बल ९ पटीने वाढणार पेन्शनची रक्कम

पेन्शनधारकांना मोदी सरकारचे मोठे गिफ्ट! तब्बल ९ पटीने वाढणार पेन्शनची रक्कम

लवकरच किमान मासिक पेन्शन नऊ पटीने वाढू शकते. म्हणजेच किमान पेन्शन दरमहा 9,000 हजार रुपयांपर्यंत वाढवण्याची तयारी सुरू आहे. कर्मचारी पेन्शन योजनेच्या सदस्यांना सरकार ही भेट देणार आहे. असे झाल्यास, आता ईपीएसशी संबंधित लोकांना 1-1 हजार रुपयांऐवजी 9-9 हजार रुपये दरमहा मिळतील.

एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, कामगार मंत्रालय फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय घेईल. या बैठकीत नव्या संहितेबाबत निर्णयही घेतला जाऊ शकतो. कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेंतर्गत किमान पेन्शन वाढवणे हा महत्त्वाच्या बैठकीचा मुख्य अजेंडा असल्याचे मानले जात आहे.

कमीत कमी पेन्शन वाढवण्यात यावी, अशी पेन्शनधारकांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. याबाबत अनेकदा वादही झाले आहेत. इतकेच नाही तर संसदेच्या स्थायी समितीनेही यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. समितीच्या शिफारशींच्या आधारे किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.

या संदर्भात संसदेच्या स्थायी समितीने मार्च 2021 मध्ये यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. यावेळी समितीने किमान पेन्शनची रक्कम सध्याच्या एक हजारावरून तीन हजारांपर्यंत वाढवावी, असे म्हटले होते. मात्र, या प्रकरणी निवृत्ती वेतनधारकांचे म्हणणे आहे की, ते 9 हजारांपर्यंत वाढवावे आणि हे तेव्हाच होईल, जेव्हा ईपीएस-95 शी संबंधित निवृत्ती वेतनधारकांना खर्‍या अर्थाने लाभ मिळेल.

याशिवाय किमान निवृत्ती वेतनाशी संबंधित व्यक्तीच्या शेवटच्या पगारातून हा निर्णय घ्यावा, अशी सूचना करण्यात आली. म्हणजेच कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीपूर्वी मिळालेला शेवटचा पगारानुसार हा निर्णय घेण्यात यावा अशी त्यांची मागणी होती. त्या आधारावर त्यांची किमान पेन्शन निश्चित केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते. संबंधित व्यक्तीच्या शेवटच्या पगारातून किमान पेन्शन ठरवावी, अशीही सूचना देण्यात आली आहे.. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या कामगार मंत्रालयाच्या बैठकीतही या सूचनेचा विचार केला जाऊ शकतो. असे झाल्यास आता ईपीएसशी संबंधित लोकांना 1-1 हजारांऐवजी 9 हजार रूपये मिळू शकतात.

महत्वाच्या बातम्या
‘या’ स्टार खेळाडूच्या फलंदाजीवर संतापले गावस्कर; म्हणाले, संघाची जबाबदारी असताना असं खेळणं मुर्खपणा
तुमच्यासारखी भिकार जमात माझा केसही वाकडा करू शकत नाही; मराठी अभिनेत्याचे मोदी समर्थकांना चॅलेंज
आई, भाऊ, बायको, मुलगी सगळे सोडून गेल्याने कपिल शर्मा शोमधील कलाकाराने घेतले विष
पंजाबमधील घटनेची राष्ट्रपतींनीही घेतली दखल, पंजाब सरकारवर कडक कारवाई होणार?