Share

कोणत्याही क्षणी ठाकरे सरकार कोसळणार, काॅंग्रेस खासदाराचा गौप्यस्फोट; कारणही सांगीतले

sharad pawar udhav thackeray

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन दोन वर्षे झाले आहे. हे सरकार स्थापन झाल्यापासू विरोधी पक्षाकडून या सरकारवर वेगवेगळे आरोप केले जात आहे. तसेच हे सरकार लवकरच पडणार असे म्हटले जात आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी तर हे सरकार कधी पडेल याच्या तारखाही दिल्या होत्या, पण सरकार अजूनही काही कोसळलेले नाही. (kumar ketkar on thackeray government)

विरोधी पक्षातील नेत्यांकडून सरकार पाडण्याबाबत कितीही वक्तव्य होत असली तरी या महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी मात्र त्याला एकच उत्तर दिले आहे. हे सरकार भक्कमपणे पाच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण करेल, असा विश्वास त्यांनी दाखवला आहे. पण अनेकदा या तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये नाराजी दिसून आली आहे. अशात काँग्रेसच्या एका दिग्गज नेत्याने एक धक्कादायक वक्तव्य केले आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार कधीही कोसळू शकतं, अशी भिती काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी वर्तवली आहे. एका वृत्तवाहिनीशी त्यांनी संवाद साधला होता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील ऑपरेशन लॉटसची आठवण करुन दिली.

ज्या क्षणापासून हे सरकार स्थापन झाले आहे. त्या क्षणापासूनच ही भिती आहे की महाराष्ट्रातले सरकार केव्हाही पडू शकतं. कर्नाटकात काय झालं, मध्य प्रदेशात काय झालं हे पाहिलं की लक्षात येतं की भाजप किती शक्तीशाली आहे. ज्यावेळी तथाकथित लोटस कँपेनमध्ये लोक स्वत:च राजीनामा देतात आणि निवडणूकीत बहुमत मिळालेल्या सरकारला जुमानत नाही आणि पुन्हा निवडून येतात. हे सर्व शक्य तरी कसं होतं, असे कुमार केतकर यांनी म्हटले आहे.

हे अत्यंत साधनशूचितेने होते. त्यांना वाटलं म्हणून ते कर्नाटक सरकारमधून बाहेर पडले, त्यांना वाटलं म्हणून ते मध्य प्रदेशातून बाहेर पडले. गोव्यातल्या लोकांनाच असं वाटलं की बाहेर पडावं, कारण भाजप हा साने गुरुजींच्य विचारांवर चालणारा पक्ष आहे. हे मला माहित आहे, असे खासदार कुमार केतकर यांनी म्हटले आहे.

हे तपास यंत्रणांचा वापर करतात की नाही, यात वाद असू शकतो. पण आपण बघतो की नारायण राणे भाजपमध्ये आल्यापासून त्यांच्या भ्रष्टाचाराच्या चर्चा पुर्णपणे थांबल्या आहे. ते भाजपमध्ये येण्याआधी भाजपचे नेतेच त्यांच्यावर भाषण करुन त्यांच्यावर गंभीर आरोप करत होते, याचे पुरावे अजूनही युट्युबवर आहे, असेही कुमार केतकर यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
‘आदित्य, उद्धव ठाकरेंना भविष्य, पण त्यांनी माझी ‘ही’ गोष्ट ऐकावी’-चंद्रकांत पाटील
शेतकऱ्यांवर गाडी चढवलेल्या लखीमपूरमध्ये भाजपच जिंकली; आठही जागा भाजपच्या ताब्यात
केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांवर कार चढवलेल्या लखीमपूरमध्ये भाजपचं काय झालं? निकाल ऐकून धक्का बसेल

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now