जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती पूर्वीपेक्षा खूपच चांगली झाली आहे. त्यात सातत्याने सुधारणा होत आहे. कलम ३७० हटवल्यानंतर राज्यात दगडफेकीच्या घटनांमध्येही घट झाली आहे. परदेशी दहशतवाद्यांची घुसखोरी आणि हल्लेही कमी झाले आहेत, अशी माहिती सीआरपीएफच्या महासंचालकांनी दिली आहे. (kuldeep singh on kashmir terrorist)
परिस्थिती सुधारण्यासाठी सीआरपीएफ सरकार आणि इतर एजन्सींच्या सहकार्याने काम करत आहे. देशाचे शत्रू जिथे असतील तिथे त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. दहशतवाद संपवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सीआरपीएफच्या ८३ व्या स्थापना दिनानिमित्त जम्मूमध्ये आलेले सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंग यांनी ही माहिती दिली.
डीजीपी कुलदीप सिंग म्हणाले की, दहशतवादी किंवा देशाचे कोणतेही शत्रू कायद्यापासून सुटू शकत नाहीत. अशा लोकांवर कायदेशीर व्यवस्थेअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल. काश्मीरमधील मशिदीत दहशतवाद्यांनी कव्हर घेतल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, दहशतवाद्यांना कोणताही धर्म नसतो. ते कुठेही लपले तरी ते सुरक्षा दलांच्या हातून सुटू शकत नाहीत.
तसेच अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेच्या तयारीबाबत डीजीपींना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना, ते म्हणाले की, सध्या ते प्रवासाच्या व्यवस्थेबाबत काहीही सांगू शकत नाहीत. यासंदर्भात आदेश प्राप्त होताच तातडीने व्यवस्था केली जाईल.
तसेच जोखीम निधीतून आर्थिक सहाय्य अंतर्गत कारवाईत शहीद झालेल्या जवानांसाठी एक्स-ग्रॅशिया रक्कम २० लाखांवरून ३० लाख रुपये करण्यात आली आहे. यासोबतच इतर सर्व प्रकरणांसाठी एक्स-ग्रॅशिया रक्कम १५ लाखांवरून २० लाख रुपये करण्यात आली आहे.
सीआपपीएफच्या स्थापना दिनाच्या तालीम परेडला संबोधित करताना, डीजीपींनी आपल्या जवानांच्या शौर्याचे आणि धैर्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, २०२१-२२ मध्ये सीआरपीएफने १६२ दहशतवादी आणि माओवाद्यांचा खात्मा केला. देशभरातील विविध कारवायांमध्ये १५०० जणांना अटक केली आणि ७५० जणांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले.
काश्मीरमध्ये सुट्टीवर घरी आलेल्या सीआरपीएफ जवानाच्या हत्येबाबत डीजीपी म्हणाले की, काश्मीर खोऱ्यातील अशा प्रकारची यावर्षीची पहिलीच घटना आहे. सुरक्षा दलांच्या हालचालींवर दहशतवादी लक्ष ठेवून आहेत. या घटनेनंतर लगेचच दहशतवाद्याला अटक करण्यात आली असून, त्याला कायदेशीर तरतुदीनुसार कठोर शिक्षा दिली जाईल.
महत्वाच्या बातम्या-
याला म्हणतात क्रेझ! रिलीजपूर्वीच अल्लू अर्जुनच्या ‘या’ चित्रपटाला मिळाली ४०० कोटींची ऑफर
भगतसिंग यांचा जन्म पाकिस्तानात झाला, मग खटकर कलान त्यांचे मूळ गाव कसे झाले?
विमानतळावर आयपीएस अधिकाऱ्याच्या बॅगमध्ये आढळली भलतीच गोष्ट; पाहून सुरक्षा रक्षकही झाले हैराण